शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! "नितीश यांनी 'इंडिया'सोबत राहावं, ते PM पदाचा चेहरा आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 17:32 IST

Dimple Yadav on Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. 

Bihar Political Crisis: बिहारचे मुख्यमंत्री 'इंडिया' आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये राजकीय उलथापथ सुरू असून नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील राजकीय गोंधळाबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी एक मोठे विधान केले. "नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत राहिल्यास त्याचा त्यांना मोठा फायदा होईल, ते पंतप्रधान पदाचा चेहरा असतील. बिहारमध्ये जे काही सुरू आहे, ते मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळत आहे", असे त्यांनी सांगितले. 

डिंपल यादव म्हणाल्या की, मुख्यमंत्री नितीश कुमार सोबत राहिले तर इंडिया आघाडी खूप मजबूत होईल. सध्याचे सरकार संविधानाच्या विरोधात काम करत असून तरुणांना नाराज करत आहे. सरकारने सर्व माता भगिनींना निराश केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला. 

तसेच डिंपल यादव यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या काँग्रेससोबत ११ जागांवर करार करण्याबाबत केलेल्या पोस्टवर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात भाजपाच्या समोर भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे आणि इंडिया आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी सपा घेईल. आमच्या पक्षाचेही नुकसान होता कामा नये. जिंकणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यामुळे मला वाटते की, जागांचा प्रश्न नाही कारण कोण जिंकू शकतो, हा खरा प्रश्न आहे. भाजपाला कोण हरवू शकते, याकडे पक्षाचे लक्ष आहे.

बिहारमध्ये राजकीय उलथापालथमागील काही दिवसांपासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आरजेडी आणि जदयूचे सरकार कोसळेल, ज्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. महाआघाडीत लालू यादव यांचा राजद, नितीश कुमार यांचा जदयू, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे. जेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेचच पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. कर्पुरी यांना भारतरत्न मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गावी पोहचून नितीश यांनी कर्पुरी यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांच्याबद्दल भाष्य केले. तसेच कर्पुरी यांनी कधीच आपल्या मुलाला पुढे आणले नाही. पण आता लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत आहेत, असे विधान त्यांनी केले. नितीश यांचा हा टोमणा लालू यादवांना असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारIndiaभारतSamajwadi Partyसमाजवादी पार्टी