शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:54 IST

या घटनेची सध्या पंचक्रोशित चर्चा होत आहे.

पाण्यात राहून मगरीशी वैर नाही करायचे, असे म्हटले जाते. मगरीच्या जबड्यात आलेली शिकार ती कधीही सोडत नाही. मात्र, उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील दोन महिलांनी असाधारण धाडस दाखवले आहे. दोघांनीही वेगवेगळ्या घटनांमध्ये मगरींशी लढून आपल्या मुलाला आणि पतीला वाचवले. एका घटनेत आईने तिच्या ५ वर्षांच्या मुलाला वाचवले, तर दुसऱ्या पत्नीने महिलेने आपल्या पतीला मगरीच्या जबड्यातून वाचवले. त्यांच्या धाडसाची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे.

मुलासाठी मगरीशी भिडली...मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवारी खैरीघाटच्या धाकिया गावात घडली. घाघरा नदीजवळून जाणाऱ्या पाच वर्षांच्या वीरुला एका मगरीने खेचत पाण्यात नेले. मुलाचा आवाज ऐकून त्याची आईने जीवाची पर्वा न करता मगरीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. मगरीला तोपर्यंत मारत राहिली, जोपर्यंत मगर मुलाला सोडत नाही. अखेर या लढाईत आईचा विजय झाला. या घटनेत मुलाला दुखापत झाली, परंतु त्याचा जीव वाचला, हे महत्वाचे आहे.

पत्नीने साडी फेकून पतीचा जीव वाचवलादुसरी घटना मोतीपूरच्या माधवपूर गावात घडली. सैफू त्याची पत्नी सुरजनासोबत रामतालिया कालवा ओलांडत असताना एका मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा पाय पकडला. सैफू ओरडला तेव्हा सुरजना हिने तिची साडी पाण्यात फेकली आणि पतीला पाण्याबाहेर ओढले. यादरम्यान गावकऱ्यांनी काठ्याने मगरीवर हल्ला केला आणि पळवून लावले. 

पुरामुळे रहिवासी भागात मगरींची हालचाल वाढली वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे नद्या आणि कालव्यांची पाण्याची पातळी वाढली आहे, ज्यामुळे मगरी रहिवासी भागात येत आहेत. या मगरींना पकडण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना नद्या आणि कालव्यांच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAnimalप्राणीWomenमहिलाriverनदी