फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत सलमान अव्वल, शाहरुख दुसरा तर विराट तिसरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 19:56 IST2017-12-22T19:55:51+5:302017-12-22T19:56:59+5:30

फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खान वार्षिक 232 कोटी रुपयांसह सेलेब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या अढळस्थानी राहिला आहे.

Salman tops Forbes list of rich celebrities, Shahrukh is second and Virat third! | फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत सलमान अव्वल, शाहरुख दुसरा तर विराट तिसरा !

फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत सलमान अव्वल, शाहरुख दुसरा तर विराट तिसरा !

मुंबई : फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खान वार्षिक 232 कोटी रुपयांसह सेलेब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या अढळस्थानी राहिला आहे.
याचबरोबर, फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलेब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवले आहे. शाहरुख खान 170 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. तर धुवॉंधार बॅटींगने धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहलीची वार्षिक कमाई 100 कोटी रुपये इतकी आहे.


कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (98 कोटी), पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (82 कोटी), आमीर खान (68 कोटी) सहाव्या, प्रियांका चोप्रा (68 कोटी) सातव्या, महेंद्रसिंह धोनी (63 कोटी) आठव्या, हृतिक रोशन (63 कोटी) नवव्या आणि अभिनेता रणवीर सिंह (62 कोटी) दहाव्या स्थानी आहे. 

Web Title: Salman tops Forbes list of rich celebrities, Shahrukh is second and Virat third!