शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

सलमान खान निर्दोष

By admin | Updated: January 19, 2017 04:54 IST

दोन काळविटांच्या शिकार खटल्यात शस्त्रास्त्रे कायद्यातील सगळ््या आरोपांतून निर्दोष मुक्त झाला

जोधपूर : चित्रपट अभिनेता सलमान खान (५१) हा १८ वर्षांपूर्वीच्या दोन काळविटांच्या शिकार खटल्यात शस्त्रास्त्रे कायद्यातील सगळ््या आरोपांतून निर्दोष मुक्त झाला आहे. येथील मुख्य न्यायदंडाधिकारी दलपत सिंह राजपुरोहित यांनी बुधवारी आपल्या १०२ पानी आदेशात खान याच्यावर खटला चालविण्याची जिल्हा प्रशासनाने दिलेली परवानगी हीच ‘निर्बुद्ध कृती’ होती, असे म्हटले. निकालाचा अभ्यास करून आम्ही सत्र न्यायालयात अपील दाखल करू, असे सरकार पक्षाचे वकील बी. एस. भाटी म्हणाले.सलमानने मुदत संपलेल्या परवान्याची बंदूक बाळगल्याचा व तिचा वापर केल्याचा आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आलेला नाही. हा निवाडा दिला जात असताना सलमान खान बहीण अलविरासह न्यायालयात उपस्थित होता. निर्दोष मुक्त होताच सलमान खानने चाहत्यांनी केलेली प्रार्थना व दिलेल्या शुभेच्छांबद्दल टिष्ट्वटरद्वारे त्यांचे आभार मानले. सलमान खानवरील आरोपपत्रात त्याने १ व २ आॅक्टोबर १९९८ रोजी राजस्थानातील जोधपूरनजीकच्या कानकनी खेड्यात दोन काळ््या काळविटांची शिकार करण्यासाठी परवान्याची मुदत संपलेली बंदूक जवळ बाळगून ती वापरली, असे म्हटले होते. तेव्हाचे जिल्हा दंडाधिकारी रजत कुमार मिश्र यांनी खटल्याला विचार न करता परवानगी दिली व त्यामुळे सलमान खान विनाकारण त्यात भरडला, असे न्यायालयाने म्हटले.>कोर्टातच दिल्या वकिलांना स्वाक्षऱ्यान्यायाधीश निकाल वाचून दाखवत असताना सलमान खान याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले व त्याचा चेहऱ्यावर संयम राखला. त्याने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांच्या शुभेच्छांना प्रतिसाद दिला व न्यायालय परिसरातून जाताना स्वाक्षऱ्याही दिल्या.बाहेर येताच त्याने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांना हात हलवून प्रतिसाद दिला. रस्त्यांवरही चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो ११.४५ वाजता निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आला व तेथे साधारणत: १५ मिनिटे होता.>सलमान ची खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर टिष्ट्वटरवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.सचिन तेंडुलकरने ‘चांगल्या लोकांचे नेहमीच चांगले होते. तू अनेकांबद्दल दयाळू आहे. तुझे ‘बिर्इंग इंडियन फाऊंडेशन’ हा त्याचाच एक भाग आहे, असे म्हटले.>नकारात्मक भावनासलमान खान निर्दोष सुटला. मला मान्य आहे. दोषी आहे ती यायव्यवस्था.सलमान खानने आपण न्यायालयाबाहेरही चांगले अभिनेते आहोत हे सिद्ध केले.गोळीच्या समोर आल्यामुळे काळविटाला दोषी धरण्यात आले.सलमान खान हा खरोखर बिग बॉस आहे. त्याचे राज्य, त्याचे नियम. न्यायाचा हा खराखुरा रियालिटी शो.फेडरर हा ग्रास कोर्टचा तर नादाल हा क्ले कोर्टचा राजा आहे तर सलमान खान हा सगळ््या भारतीय कोर्टांचा राजा आहे.>निकालामुळे आमचे कुटुंब आनंदी - सलीम खानसलमान खानचे वडील व पटकथा लेखक सलीम खान म्हणाले की ‘‘निकालामुळे आमचे कुटुंब आनंदी असून सुटल्यासारखे वाटते. बऱ्याच काळपासून असलेला तणाव दूर झाला आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा नेहमीच विश्वास होता. १८ वर्षे हा प्रदीर्घ काळ झाला व हा संपूर्ण काळ आम्ही तणावात होतो.’’दरम्यान सलमान तुरुंगातही गेला. तो फरार झाला नाही. त्याने प्रत्येक प्रश्नाला तोंड दिले व त्याला जेव्हा जेव्हा न्यायालयात हजर राहायला सांगितले तेव्हा तो गेला. आम्ही तर अत्यंत कठोर परिस्थितीला तोंड द्यायची तयारी केली होती परंत परमेश्वराच्या कृपेमुळे सगळे छान झाले, असेही सलीम खान म्हणाले.