काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:47+5:302021-03-14T06:50:13+5:30

वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. 

Sahitya Akademi Award to Congress leader and former Chief Minister of Karnataka Veerappa Moily | काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Next

नवी दिल्ली  : काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली (Veerappa Moily) यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी जैन धर्माचे भगवान बाहुबली यांच्या जीवनचरित्रावर ‘श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम’ हे महाकाव्य रचले. या त्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Sahitya Akademi Award to Congress leader and former Chief Minister of Karnataka Veerappa Moily)

वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. 

राजकारण म्हणजे मूर्ख लोकांचा अड्डा, दहशत गर्दी, काहीच न कळणारे लोक असा समज असतो. मात्र, वीरप्पा मोईली त्याला अपवाद ठरतात. भगवान बाहुबली हे जैनधर्मीयांतील एक धगधगते वादळ आहे. त्यांच्या जीवनावरती काही लिहणे ही एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर वाचन, मनन, चिंतन लागतं. वीरप्पा मोईली सांगतात की ते रोज या लिखाणासाठी, संशोधनासाठी तीन ते चार तास द्यायचो. तेव्हा हे महाकाव्य साडेतीन वर्षांत पूर्ण झाले. 

बाहुबली भगवान म्हणजे जास्तीत जास्त रवींद्र जैन यांचे बाहुबली भगवान का मस्तकाभिषेक हे एवढंच माहीत असते; पण बाहुबलींचे चरित्र अभ्यासणारा असा कुणीतरी नेता आहे. हे लक्षात यायला वेळ लागतो. जैन साहित्याचे रेफरन्स शोधणे, शब्दांचा अर्थ लावणे हे महाकठीण काम होऊन जाते. 

आचार्य श्री विद्यासागर महाराजांनी रचलेले आणि ज्ञानपीठानं प्रकाशित केलंले ‘मूक माटी’ वाचताना अनेक शब्दांचे अर्थ लागत नाहीत; पण त्याला तोड म्हणून मुनी निर्वेगसागर यांनी लिहलेले ‘संक्षिप्त मूक माटी’ वाचताना त्यातील शब्दांचे अर्थ लागत 
जातात.

मोईली यांचे अभिनंदन
राजकारणात असणारा एखादा माणूस असे परिश्रम घेऊन काही रचतो, ही मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. वीरप्पा मोईली यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. 

Web Title: Sahitya Akademi Award to Congress leader and former Chief Minister of Karnataka Veerappa Moily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.