शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

दिग्विजय सिंह 'दहशतवादी', साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 7:59 PM

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवारसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हटले आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्याचा नायनाट करण्यासाठी एका संन्यासीनीला निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी  केले आहे. 

सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, " राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे 16 वर्षापर्यंत ते डोकं वर काढू शकले नव्हते. त्यांना राजकारण ही करता आले नाही. आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढले तर त्यांना पुन्हा एका संन्यासीनीसोबत सामना करावा लागत आहे. हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे."

याआधी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही होत आहे. 

दरम्यान, भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या, वाचा त्यांच्याच भाषेत....."वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.""ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.""मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात माजी पोलीस अधिकारी रिंगणातमुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने एल्गार पुकारला आहे. रियाजउद्दीन देशमुख असं या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून देशमुख यांनी भोपाळमधून प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  देशमुख सध्या औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाBJPभाजपाbhopal-pcभोपाळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक