शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:23 PM

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली - भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तसेच आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

'काँग्रेसने नऊ वर्षांत केलेल्या छळामुळे मला अनेक जखमा झाल्या, तर अनेक जखमा नव्याने ताज्या झाल्या. या त्रासामुळे माझ्या डोळ्यांना त्रास झाला व मेंदूला सूज देखील आली. माझ्या एका डोळ्याने मला अजिबात दिसत नाही, तर दुसऱ्या डोळ्यानेसुद्धा अंधुक दिसत आहे' असं प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं आहे. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी झालेल्या तुरुंगवासाचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली आहे.

भोपाळमध्ये कोरोनाच्या संकटात प्रज्ञा सिंह बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर प्रश्न विचारला असता लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे दिल्लीहून भोपाळला येता आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कर्मचारी व सुरक्षारक्षकांना तिकिटे मिळाली नाहीत अशी माहिती दिली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा प्रज्ञा सिंह भोपाळमध्येच होत्या व नंतर अल्पशः आजारावर उपचार करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या, असा दावा काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री पी. सी शर्मा यांनी केला. तसेच त्यांच्या काँग्रेसच्या छळवणुकीचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

India China Faceoff : "राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये", जखमी जवानाचे वडील म्हणतात...

इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस