शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"मदरशांमधून लव जिहादचा प्रसार, मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी 10 ते 25 लाखांचा निधी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 08:44 IST

Sadhvi Prachi And Love Jihad : विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधान केलं आहे. लव जिहाद प्रकरणावरुन त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्य विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधान केलं आहे. लव जिहाद प्रकरणावरुन त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जात असून यासाठी अरब देशांमधून पैसा येत असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला आहे. सरकारने अशा घटनांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत लव जिहाद करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणीही साध्वी प्राची यांनी केली आहे. लखनऊमधील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साध्वी प्राची यांनी असं म्हटलं आहे.

साध्वी प्राची यांनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जात आहे. अरब राष्ट्रांमधून येणाऱ्या पैशामुळे हा प्रकार वाढीस लागला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी 10 ते 25 लाखांचा निधी दिला जात आहे" असा दावा साध्वी प्राची यांनी केला. काही दिवसांपूर्वी मंदीरात नमाज पठनाचा एक प्रकार घडला होता. साध्वी प्राची यांनी हा प्रकार षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. 

"देशात एकता कायम राहावी यासाठी मी मशिदीत हवन करू इच्छिते"

"देशात भाईचारा गँग सक्रिय आहे, त्यांना मी इतकच सांगू इच्छिते की देशात एकता कायम राहावी यासाठी मी मशिदीत हवन करू इच्छिते" असं म्हटलं आहे. साध्वी प्राची यांच्या या विधानावर देशातील संतांची सर्वात मोठी परिषद असलेल्या आखाडा परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी साध्वी प्राची यांनी भडकाऊ वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर (Cabinet Minister Usha Thakur) यांनी काही दिवसांपूर्वी मदरशांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असं भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटलं होतं. "सर्व कट्टरवादी व सर्व दहशतवादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसमने हे करून देखील दाखवलं आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Jihadलव्ह जिहादIndiaभारतMONEYपैसा