आईच्या आजाराचं कारण देत साध्वीला आश्रमातून नेलं अन् केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 15:43 IST2019-10-29T15:42:44+5:302019-10-29T15:43:29+5:30
शेखपुरा जिल्ह्यात अरियरी पोलीस स्टेशनच्या स्थानकातील फुलचोड गावात एक भयंकर घटना घडली आहे

आईच्या आजाराचं कारण देत साध्वीला आश्रमातून नेलं अन् केला सामूहिक बलात्कार
बिहारः शेखपुरा जिल्ह्यात अरियरी पोलीस स्टेशनच्या स्थानकातील फुलचोड गावात एक भयंकर घटना घडली आहे. फुलचोड गावाजवळ रविवारी एका साध्वीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. शेखपुरा महिला ठाण्याच्या अध्यक्षा यशोदा देवी म्हणाल्या, साध्वीवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींपैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशमधल्या बस्ती जिल्ह्यातील एका गावात राहणारे आहेत. पीडिताही पण त्याच गावात वास्तव्याला आहे.
पीडित शेजारील नवादा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ ककोलतमध्ये आपल्या सहकारी मैत्रिणींसह राहत होती. पीडितेनं सांगितलं की, गावातील दोन जण इतर दोघांबरोबर रविवारी माझ्या आश्रमात आले. माझी आई आजारी असल्याचं सांगत ते मला स्वतःबरोबर घेऊन गेले. एका वाहनातून मला नेत असताना शेखपुरा जिल्ह्यातील फुलचोड गावाजवळ त्यांनी माझ्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.