शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साध्वींनंतर माहेश्वरी, भाजपा आमदाराचे शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 19:23 IST

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

जयपूर - भाजपाआमदार माहेश्वरी यांनी शहीद हमेंत करकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भगवा दहशतवादाच्या नावाखाली भारत देशाला बदनाम करण्याच्या कट-कारस्थानात हेमंत करकरे यांचा सहभाग होता, असे राजस्थानमधील भाजपाआमदार माहेश्वर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग यांच्यानंतर आता माहेश्वरी यांनीही शहीद हेमंत करकरेंना लक्ष्य केलं आहे. 

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर, देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तर, विरोधकांनीही साध्वी प्रज्ञा यांच्या विधानावरुन भाजपाला लक्ष्य केले होते. त्यानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या विधानबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. मात्र, आता राजस्थानमधील भाजपा आमदार किरण माहेश्वरी यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. 

दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून, साध्वी प्रज्ञा यांना दिलेली अमानवीय छळाची वागणूक किंवा गुन्हा कमी होत नाही. प्रामाणिकपणा किंवा धाडसी बाणा दाखवल्यामुळे, कुठल्याही निरपराध नागरिकाला खोट्या प्रकरणात फसविण्याचा परवाना तुम्हाला मिळत नाही, असेही माहेश्वरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात दंग निर्माण झाले. हेमंत करकरे कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना शहीद मानले जाईल,' असे महाजन म्हणाल्या. मात्र त्यांनी करकरेंच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला. तर, आता आमदार माहेश्वरी यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. आमदार किरण माहेश्वरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारेच हे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, अरुण शौरी नावाच्या एका फॅनच्या अकाऊंटला उत्तर देताना हे ट्विट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाBJPभाजपाMLAआमदारRajasthanराजस्थानTerrorismदहशतवाद