मंडळाची मुदत संपल्याने घरेलू कामगार वार्‍यावर सन्मानधन थकले: मोलकरीण संघटनेने केली निदर्शने

By Admin | Updated: March 21, 2015 00:15 IST2015-03-20T22:39:45+5:302015-03-21T00:15:12+5:30

नाशिक- राज्य सरकारने घरेलू कामगारांसाठी स्थापन केलेल्या मंडळाची मुदत गेल्या ऑगस्ट महिन्यातच संपली असून, त्यामुळे घरेलू कामगारांची मानधन आणि अन्य सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भातील विविध शेकडो प्रकरणे अडकली आहेत. त्यामुळे सदस्य नियुक्ती करून तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Sadanand Tired of Domestic Workers' War After Mandal's term expires: Malkirin Sanghatana | मंडळाची मुदत संपल्याने घरेलू कामगार वार्‍यावर सन्मानधन थकले: मोलकरीण संघटनेने केली निदर्शने

मंडळाची मुदत संपल्याने घरेलू कामगार वार्‍यावर सन्मानधन थकले: मोलकरीण संघटनेने केली निदर्शने

नाशिक- राज्य सरकारने घरेलू कामगारांसाठी स्थापन केलेल्या मंडळाची मुदत गेल्या ऑगस्ट महिन्यातच संपली असून, त्यामुळे घरेलू कामगारांची मानधन आणि अन्य सर्व योजना ठप्प झाल्या आहेत. कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भातील विविध शेकडो प्रकरणे अडकली आहेत. त्यामुळे सदस्य नियुक्ती करून तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्य शासनाने असंघटित कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. त्याअंतर्गतच घरेलल कामगारांसाठी मंडळ स्थापन केले आहेत. या मंडळावर काम करणार्‍या १३ अशासकीय सदस्यांची मुदत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच संपली, परंतु नवीन सत्तारूढ सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने या नियुक्त्या रखडल्या नाही. त्यामुळे घरेलू कामगारांना वीमा योजना, शिष्यवृत्ती, सन्मानधन अशा ज्या योजनांसाठी मंडळाची मान्यता आवश्यक आहे, अशा प्रकारच्या सर्व मान्यता नऊ महिन्यांपासून रखडल्या आहेत. नाशिक शहरात आयटकच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून सुमारे साडेतीनशे सन्मानधन योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या मोलकरणींना दहा हजार रुपये सन्मानधन दिले जाते. मात्र, हे प्रस्तावही रखडले आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही, असे यासंदर्भात सांगण्यात येत असल्याने मोलकरीण संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चौकशी केली असता कामगार उपआयुक्त कार्यालय आणि मंंडळ यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे आढळले. मुंबईत मंडळाच्या माध्यमातून चार विमा पॉलिसी काढल्याचे माहितीच्या अधिकारात उपलब्ध होत असताना कामगार उपआयुक्त कार्यालयाला एकाच पॉलिसीविषयी माहिती आहे. या सर्व प्रकारचे निराकरण करावे यासाठी घरकामगार मोलकरीण संघटनेच्या वतीने कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि उपआयुक्त आर. आर. जाधव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राजू देसले, संगीता उदमले, आम्रपाली अहिरे, भारती खैरे, सुनीता कुलकर्णी, कल्पना निकम, राधा जाधव, चंद्रभागा गरुड, ज्योती धुमाळ, शोभा चव्हाण आदि सहभागी झाले होते.
....इन्फो.....
युतीतील वादामुळे रखडल्या नियुक्त्या
राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यांत त्यांना घरेलू कामगार मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्त्या करण्यास वेळ मिळालेला नाही.भाजपा आणि शिवसेनेच्या वादात हा विषय रखडल्याचे सांगितले जात आहे.
- राजु देसले, कार्याध्यक्ष, घर कामगार मोलकरीण संघटना.
छायाचित्र आर फोटोवर २० मोलकरीण नावाने सेव्ह आहे.

Web Title: Sadanand Tired of Domestic Workers' War After Mandal's term expires: Malkirin Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.