सर्मथांनी केले राष्ट्रासाठी जीवन अर्पण सुनील चिंचोलकर: शिवस्मारक व्याख्यानमाला
By Admin | Updated: April 23, 2015 02:13 IST2015-04-23T02:13:20+5:302015-04-23T02:13:20+5:30
सोलापूर :

सर्मथांनी केले राष्ट्रासाठी जीवन अर्पण सुनील चिंचोलकर: शिवस्मारक व्याख्यानमाला
स लापूर : आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करण्यासाठी सर्मथ रामदासांनी लग्न केले नाही. अर्थार्जन न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न मंडपातून पळून जाऊन नाशिक येथे तपश्चर्या केली. आपले मन, मेंदू आणि मनगट बळकट करून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केले, असे मत सुनील चिंचोलकर यांनी व्यक्त केले. र्शी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूरच्या वतीने शिवस्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ‘र्शी रामदास स्वामी यांचे जीवनचरित्र व व्याख्यान कौशल्य’ या विषयावर सुनील चिंचोलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर र्शी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर देशमुख, कोषाध्यक्ष दामोदर दरगड, आकाशवाणी केंद्राचे संचालक सुनील शिनखेडे आदी उपस्थित होते. सर्मथांच्या जीवन चरित्रावर बोलताना चिंचोलकर म्हणाले की, 12 व्या वर्षी लग्न मंडपातून पळून गेल्यानंतर त्यांची नियोजित वधू सावित्री हिचे वा?ोळे होणार नाही याची काळजी घेतली होती. त्यांनी आपले थोरले बंधू गंगाधरपंत यांना पूर्वकल्पना देऊन त्याच मंडपात अंबाड्याच्या मुलाशी तिचा विवाह लावून देण्यास सांगितले. ती त्याच्यासोबत लग्न करून सुखी झाली़ परत तिचा आणि रामदासांचा संबंध आला नाही, असे हनुमंत स्वामींच्या बखरीत स्पष्ट केले आहे. सर्मथ रामदासांनी 12 वर्षे जन्मघरात, 12 वर्षे नाशिकमध्ये तर 12 वर्षे भारत भ्रमण केले. त्यानंतर 38 वर्षे त्यांनी देश, देव आणि धर्मासाठी घालवले. या जीवन प्रवासात सर्मथांनी मन, मेंदू आणि मनगट या तीन गोष्टी बळकट केल्या. सर्मथ रामदास हे पहाटे 3 वाजता उठत असत, त्यानंतर ते एक तास ध्यान संध्या, 4 ते 6 सूर्यनमस्कार आणि सकाळी 6 वा. नाशिकमधल्या गोदावरी नदीत कमरेएवढय़ा पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जाप करीत असत. त्यानंतर ते आपले निवास असलेल्या गुहेत जाऊन नामस्मरण करीत असत. सकाळ सत्रात दूध पिऊन दुपारी भिक्षा मागत आणि अर्धा तास झोप घेत असत. त्यानंतर ते उपनिषेध ऐकत असत. अशी दिनचर्या सर्मथ रामदासांची होती. सर्मथ रामदासांनी व्यवस्थापन कौशल्यातून स्वत:च्या जीवनाची चौकट आखून घेतली होती, असेही सुनील चिंचोलकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)सर्मथ रामदासांचे रामायण..सर्मथ रामदासांनी 17 व्या शतकात वाल्मिकी रामायण लिहून ठेवले आहे. हे रामायण आजही अस्तित्वात असून ते आता छापून येण्याच्या स्थितीत आहे. लवकरच सर्मथ रामदासांनी लिहिलेले रामायण सर्वांना वाचायला मिळेल, असेही यावेळी सुनील चिंचोलकर यांनी सांगितले.