शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

हे तर बलिदान... पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:56 IST

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला.

ठळक मुद्देपोलिसांनी शेतकऱ्यांवर निर्दयी लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर, सुशील काजल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

चंढीगड - हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, दुर्दैवाने पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, टोल नाक्यांवरही ठिय्या केला. त्यामुळे, पोलिसांनी शेतकऱ्यांवर निर्दयी लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर, सुशील काजल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनाचे सर्व अपडेट देणाऱ्या गुरनामसिंग चढूनी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. त्यासोबतच, सुशील काजल हे केवळ 1.5 एकर शेतजमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या 9 महिन्यांपासून ते शेतकरी आंदोलनात सहभागी होते. मात्र, करनाल टोल प्लाझावर शनिवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर, मध्यरात्री ह्रदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले, असे गुरनामसिंग यांनी सांगितले. तसेच, आपल्या ह्या बलिदानासाठी शेतकरी जमात आपली सदैव ऋणी राहिल, असेही चढूणी म्हणाले. 

चौकशीची मागणी 

काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनीहा या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निंदा केली आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणाPoliceपोलिसBJPभाजपा