एलबीडब्ल्यू म्हणत सचिनच्या अनंत अंबानींना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:18 IST2024-03-06T10:17:53+5:302024-03-06T10:18:47+5:30

तेंडुलकर यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली असून, त्यांच्या कल्पकतेचे नेटकर मंडळींनी कौतुक केले आहे.

Sachin tendulkars wishes to Anant Ambani and says LBW | एलबीडब्ल्यू म्हणत सचिनच्या अनंत अंबानींना शुभेच्छा

एलबीडब्ल्यू म्हणत सचिनच्या अनंत अंबानींना शुभेच्छा

नवी दिल्ली : लेग बिफोर विकेट हा एलबीडब्ल्यूचा खरा अर्थ आहे. मात्र प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ‘लव्ह, ब्लेसिंग्ज, विशेश’ असा एलबीडब्ल्यूचा नवा अर्थ सांगत ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत व त्यांची होणारी वधू राधिका मर्चंट या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तेंडुलकर यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली असून, त्यांच्या कल्पकतेचे नेटकर मंडळींनी कौतुक केले आहे.

गुजरातमधील जामनगरला झालेल्या या सोहळ्याला जगभरातून अनेक नामवंत लोक सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटच्या परिभाषेचा वापर करून अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तेंडुलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, दी एलबीडब्ल्यूचा मला गवसलेला नवा अर्थ ‘लव्ह, ब्लेसिंग्ज, विशेश’ असा आहे. त्याच दृष्टिकोनातून मी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांनी शुभेच्छा देत आहे. सचिन तेंडुलकर यांच्या कल्पकतेला नेटकऱ्यांनी मनमोकळी दाद दिली आहे.
 

Web Title: Sachin tendulkars wishes to Anant Ambani and says LBW