शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Political Crisis : राजस्थानच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा; काँग्रेसच्या आमदारांना व्हिप जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 08:06 IST

रविवारच्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने सोमवारी सकाळी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

जयपूर : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते 30 आमदारांसह भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, सचिन पायलट यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे सुत्रांकडून समजते. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, रविवारच्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने सोमवारी सकाळी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसने रात्री उशिरा आपल्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. राजस्थानमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अविनाश पांडे म्हणाले की, राजस्थान सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे. 109 आमदारांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. तसेच, सर्व आमदारांना व्हिप जारी केला असून जर एखादा आमदार या बैठकीला उपस्थित राहिला नाही तर पक्षाकडून त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे अविनाश पांडे यांनी सांगितले. यावेळी अविनाश पांडे यांच्यासमवेत रणदीप सुरजेवाला देखील उपस्थित होते.

 

सचिन पायलट यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपामध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक ट्वीट केले. 'मित्राच्या सध्याच्या स्थितीवर दया येते, मुख्यमंत्री गेहलोत सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता यांना प्राधान्य दिले जात नाही' अशा स्वरुपाचे हे ट्वीटआहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपाने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सचिन पायलट करत आहेत. भाजपाच्या पाठिंब्यावर सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच, एएनआय या वृत्तसंस्थेने काँग्रेसचे किमान 30 आमदार आणि निवडक अपक्ष आमदार  सचिन पायलट यांचे समर्थन करत असल्याचे वृत्त दिले आहे.

काँग्रेस बंड मोडून काढणारकाँग्रेस व गेहलोत यांनीही पायलट यांच्या बंड मोडून काढायचे आणि पायलट यांना एकटे पाडायचे, ठरविले असावे, असे दिसते. त्यामुळेच राजस्थानात गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत असून प्रत्येक आमदाराला १५ कोटी रुपयांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारीच केला होता.त्यानंतर भाजपच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गेहलोत आणि पायलट यांना त्यांचे म्हणणे नोंदविण्यास पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पायलट अधिकच संतापले आहेत.

तीन अपक्ष आमदारांवर नोंदवले गुन्हे- अपक्ष आमदार फोडून राजस्थानमधील काँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कथित ‘कारस्थाना’वरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याच संदर्भात सरकारला पाठिंबा देणा-या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध गुन्हे नोंदविले.- ओम प्रकाश हुडला, सुरेश टांक व खुशवीर सिंग या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे, यास ह्यएसीबीह्णचे महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी दुजोरा दिला. हा गुन्हा नोंदविला जाताच काँग्रेसने या तिघांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सहयोगी सदस्यत्वही रद्द केले.- सरकार पाडण्यासाठी बांसवाडा आणि डुंगरपूरमधील अपक्ष आमदारांसह इतरही काही आमदारांना कोट्यवधी रुपयांची लांच देऊ केल्याच्या आरोपांवरून हे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच देणे हाही गुन्हा आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेसBJPभाजपा