शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:28 IST

Sachin Pilot: सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधींकडे राजस्थानचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जयपूर: अनेक काँग्रेसशासित राज्यात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. यातच आता राजस्थानमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आगामी निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ मला मुख्यमंत्री करा', अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. 

पंजाबप्रमाणे राजस्थानची स्थिती?सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यात सचिन पायलटने राहुल, प्रियंका आमि सोनिया यांच्या भेटी घेतल्या आहेत. राजस्थानमध्ये डिसेंबर 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. मला मुख्यमंत्री न केल्यास पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल, असे पायलटने हायकमांडला सांगितले आहे. पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी यांना अखेरच्या काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला फेल ठरला होता.

अनेक नेत्यांचा भाजप प्रवेशयापूर्वी सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला, त्यामुळे त्यांच्या मागणीकडे काँग्रेस गांभीर्याने पाहू शकते. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांचा विचार केला तर आता फक्त सचिन पायलट उरले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांसारखे मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

यापूर्वीही केला होता बंडसचिन पायलटने यापूर्वीही राजस्थानचे मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती. 2018 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. तेव्हा सचिन पायलट मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांच्या जागी दिग्गज अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दोन वर्षांनंतर, पायलट यांनी 18 आमदारांसह बंड केले, पण पक्षाने त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटSonia Gandhiसोनिया गांधी