शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पाकिस्तान, चीनचे हवाई हल्ले निष्प्रभ करणार S-400 एअर डिफेंन्स सिस्टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 5:04 PM

भारत लवकरच रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असून, त्या दिशेने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्दे शत्रूची लढाऊ, टेहळणी विमाने, क्रूझ मिसाईल आणि ड्रोन विमाने 400 किलोमीटर अंतरावर असतानाच नष्ट करता येऊ शकतात. भारतीय हवाई दलाच्या अधिका-यांनी दोनवेळा या सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या.

नवी दिल्ली, दि. 6 - भारत लवकरच रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असून, त्या दिशेने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय हवाई दलाने नुकत्याच या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. हवाई दलाच्या ताफ्यात S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश झाल्यानंतर हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. 

S-400 सिस्टीमच्या समावेशानंतर शत्रूची लढाऊ, टेहळणी विमाने, क्रूझ मिसाईल आणि ड्रोन विमाने 400 किलोमीटर अंतरावर असतानाच नष्ट करता येऊ शकतात. रशियामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिका-यांनी दोनवेळा या सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या. या सिस्टीममुळे भारताला  आपल्या हद्दीत राहूनच चीन आणि पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्प्रभ करता येतील तसेच हवाई वर्चस्वही मिळवता येईल. 

या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाचा रोसोबोरॉनएक्सपोर्ट या कंपनीबरोबर खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कंपनी रशियाच्या अन्य देशांबरोबरच्या संरक्षण व्यवहाराचे काम पाहते. त्यात किंमती ठरवणे, डिलव्हरी या विषयांचा समावेश असतो.  S-400 एअर डिफेन्स सिस्टीम महागडी असली तरी, भारताला ही सिस्टीम हवी आहे.  या सिस्टीममुळे आपल्या पाकिस्तानवर वरचढ होता येईल तसेच आपण चीनशी बरोबरी साधता येईल. कारण चीनने आधीच ही सिस्टीम विकत घेतली आहे. 

काय आहे एअर डिफेंन्स सिस्टीम  

- रशियाच्या अलमाझ अँटे कंपनीने S-400 एअर डिफेंन्स मिसाईल सिस्टीम बनवली आहे. यामध्ये रडार, मिसाइल लाँचर्सचा समावेश आहे. 

- 400 किलोमीटरच्या टप्प्यातील 36 लक्ष्याचा एकाचवेळी लक्ष्यभेद करण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे. 

- या सिस्टीममुळे पाकिस्तानचे सर्व हवाई तळ आणि तिबेटमधील चीनचे लष्करी तळ भारताच्या रेंजमध्ये येतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत 17 व्या भारत-रशिया परिषदेत एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम विक्रीचा करार झाला. मागच्यावर्षी ऑक्टोंबर 2016 मध्ये हा करार झाला होता. 

मागच्यावर्षी भारत-रशिया 17 व्या परिषदेत भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश मिळून फ्रिगेटस् आणि लष्करी हेलिकॉप्टरांचे संयुक्तरीत्या उत्पादन करतील. याशिवाय विविध क्षेत्रांतील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्णयही दोघांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. दोन्ही नेत्यांनी कुडनुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका युनिटचे लोकार्पण केले. लष्करी करारानुसार भारत रशियाकडून गेमचेंजर एस-४00 ट्रायंफ हवाई सुरक्षा यंत्रणा विकत घेणार आहे. तिची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देश मिळून ४ अत्याधुनिक फ्रिगेटची बांधणी करणार आहेत, तसेच कामोव्ह हेलिकॉप्टरसाठी निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत. 

टॅग्स :Indiaभारत