Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:06 IST2025-07-16T09:06:06+5:302025-07-16T09:06:34+5:30

Russian Woman : काही दिवसापूर्वी कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन लहान मुलांसह सापडली. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली.

Russian Woman mystery of the Russian woman found in a cave has been solved She was in love with a businessman, the father of her children has been found | Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले

Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले

Russian Woman :  काही दिवसापूर्वी कर्नाटकातील गोकर्ण येथील एका गुहेत एक रशियन महिला दोन लहान मुलांसह सापडली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. दरम्यान, आता नवीन माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी मुलांच्या वडिलांबद्दल माहिती गोळा केल्याचे वृत्त आहे. मुलांचा वडील एक इस्रायली व्यापारी आहे, ती महिला आणि तो व्यावसायिक ७-८ वर्षांपूर्वी भेटले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय नीना कुटीना म्हणते की मुलांचे वडील एक इस्रायली व्यापारी आहेत. गोव्यातील एका गुहेत राहताना तिने एका मुलीला जन्म दिल्याचेही तिने सांगितले आहे. या महिलेचा व्हिसा २०१७ मध्ये संपला होता. तिला सध्या कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

समुपदेशकाच्या मदतीने मिळाली माहिती

सुरुवातीला नीना मुलांच्या वडिलांचे नाव सांगण्यास तयार नव्हती, पण समुपदेशकाच्या मदतीने तिने इस्रायली व्यावसायिकाबद्दल माहिती दिली. तिने सांगितले आहे की, ती त्या व्यावसायिकाशी संबंधात होती. फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना मुलांच्या वडिलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तो बिझनेस व्हिसावर भारतात आहे.

मंगळवारी, FRRO अधिकाऱ्यांनी त्या इस्रायली व्यक्तीसोबत भेट घेतली. तो नीना आणि मुलांच्या तिकिटांचे स्पॉन्सर करण्यास तयार आहे का हे जाणून घेतले. तो इस्रायली व्यक्ती नीनाला खूप दिवसांपूर्वी भेटला होता आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तो कापडाचा व्यापारी आहे. 

अधिकाऱ्यांनी रशियन वाणिज्य दूतावासाला कळवले आहे. सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि मुलांसह नीनाला परत पाठवण्यासाठी सुमारे एक महिना लागेल. तिला रशियामध्ये आणखी एक मूल.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 'गोव्यातील एका गुहेत राहून तिने स्वतः मुलाला जन्म दिल्याचा दावा महिलेने केला आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी, आपण ते नाकारू शकत नाही. नीनाने सांगितले आहे की, ती २०१७ किंवा २०१८ मध्ये त्या इस्रायली पुरूषाला भेटली होती आणि तो त्याच्या देशात परतला होता.

रशियन महिला भारतात का आली होती?

पीटीआयच्या वृत्तानुसार, ४० वर्षीय नीना कुटीना उर्फ मोही रशियाहून बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. हिंदू धर्म आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरांनी तिच्यावर खूप प्रभाव पडला होता, म्हणून ती गोव्यामार्गे पवित्र किनारी शहर गोकर्ण येथे पोहोचली.

मोहीला प्रेया (६) आणि अमा (४) ही दोन मुले आहेत, ती जंगलाच्या मध्यभागी आणि जवळजवळ दोन आठवड्यांपासून पूर्णपणे एकांतवासात राहत होती.

Web Title: Russian Woman mystery of the Russian woman found in a cave has been solved She was in love with a businessman, the father of her children has been found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.