शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

भारतात दरवर्षी होणार Sputnik V लसीच्या ८५ कोटी डोसचं उत्पादन; सिंगल डोस लसही लवकरच येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 2:34 PM

Russian Coronavirus Vaccine Sputnik V : सिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती.

ठळक मुद्देसिंगल शॉट लस स्पुटनिक लाईटही लवकरच भारतात येणार असल्याची कंपनीची माहिती. Sputnik V ची दुसरी खेप हैदराबादमध्ये झाली दाखल.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रशियाकडून Sputnik V या लसीची दुसरी खेप रविवारी भारतात दाखल झाली. सध्या देशात नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसी देण्यात येत आहे. येत्या आठड्यापासून Sputnik V ही लसदेखील बाजारात उपलब्ध होणार आहे. हेही वाचा - अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...यादरम्यान भारतातीलरशियाचे राजदूत एन. कुदाशेव (N. Kudashev) यांनी वृत्तसंस्था ANI बोलताना ही एक रशियन-भारतीय लस (Russian-Indian vaccine) असल्याचं म्हटलं. हळहळू भारतात या लसीचं उत्पादन वाढवून ८५ कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येईल. तसंच भारतात लवकरच Sputnik V ची सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट (Sputnik Lite) आणली जाणार असल्याचंही कुदाशेव म्हणाले. 

"भारतात लसीचं उत्पादन तेजीनं वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. रशियामध्ये जुलै २०२० पासून लोकांच्या लसीकरणासाठी याच लसीचा वापर करण्यात येत आहे. ही लस तिच्या प्रभावीपणासाठी जगभरात ओळखली जाते. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या विरोधातही ही लस काम करणार असल्याचं रशियाच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे," असं कुदाशेव म्हणाले. ९९५ रूपयांना मिळणार एक डोसस्पुटनिक व्ही (Sputnik V) ची भारतातील किंमत (Indian Price declaired) जाहीर करण्यात आली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात ९९५.४० रुपये प्रति डोस या दरानं मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषध निर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. (Sputnik V vaccine priced at Rs 995 per dose in India, first shot administered by Dr Reddy's in Hyderabad)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतrussiaरशियाTelanganaतेलंगणा