शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाकडून सर्वोच्च सन्मान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:38 IST

द्विपक्षीय संबंध सुधारल्याबद्दल होणार गौरव

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. रशियातील सर्वोच्च अशा 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदका'नं मोदींचा गौरव करण्यात येणार आहे. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येईल. रशियन दूतावासानं ट्विट करुन ही माहिती दिली. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि सामरिक सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं रशियन दूतावासानं म्हटलं आहे. यासाठी मोदींना 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदका'नं सन्मानित करण्यात येईल. हा रशियाचा सर्वाच्च पुरस्कार मानला जातो. रशियाकडून दिला जाणाऱ्या या सन्मानाला मोठा इतिहास आहे. 17 व्या शतकापासून हा पुरस्कार दिला जातो. पीटर द ग्रेटनं या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सोव्हिएत रशियानं 1918 मध्ये हा पुरस्कार बंद केला होता. 1998 मध्ये हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात आला. उत्तम कामगिरी करणारे राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा सेंट अँड्रू द अपोसल पदकानं सन्मान करण्यात येतो. 2017 मध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना हा सन्मान देण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात (4 एप्रिल) मोदींना यूएईकडून सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. या महिन्याच्या शेवटी यूएईकडून मोदींना 'झाएद पदका'नं गौरवलं जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यानं हा सन्मान नेमका कधी दिला जाणार, याची तारीख ठरलेली नाही. मोदींना दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्ताननं सर्वोच्च सन्मानानं गौरवलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrussiaरशिया