शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भाजपवर जोरदार टीका पण RSSचे कौतुक; ममता बॅनर्जींच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 20:49 IST

ममता बॅनर्जींनी कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान RSSचे कौतुक केले.

कोलकाता: कोळसा घोटाळाप्रकरणी सीएम ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावरुन ममता यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या कुटुंबीयांना नोटीस मिळाल्यास आम्ही कायदेशीर लढाई लढू, असे त्या म्हणाल्या. भाजपवर टीका करताना ममता बॅनर्जींनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केला.

ममता म्हणाल्या, 'भाजप म्हणते कोळसा घोटाळ्याचा माल कालीघाटात जातो. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मग हा पैसा मां कालीकडे जात आहे का? केंद्र ना आम्हाला मदत करत आहे, ना जीएसटी भरपाई देत आहे. या संदर्भात पंतप्रधानांना भेटल्यावर लोक म्हणतात की मी सेटिंगसाठी गेले होते. पण, मी भाजपसारखी नाही, मी सेटिंग करत नाही.'

RSS वर काय म्हणाल्या ममता..?ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'आरएसएस वाईट नाही. भाजपच्या विचारांशी सहमत नसलेलेही अनेक लोक आरएसएसमध्ये आहेत. अनेक संघ कार्यकर्त्यांना भाजप आवडत नाही आणि ते लवकरच बाहेर येतील.' पोलीस दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत होत्या. याचा राजकीय अर्थ काय ?ममता बॅनर्जी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहेत. अलीकडच्या काळात अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे पक्षाला फटका बसला आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जींना डॅमेज कंट्रोल करण्याची मोठी गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड खेळले होते, आता ममता पुन्हा एकदा हिंदू कार्ड खेळण्याच्या तयारीत आहेत. हिंदू व्होट बँकेच्या बाबतीत भाजपची खरी ताकद आरएसएसकडे आहे, हे ममतांना माहीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही लोकही भाजपच्या विरोधात गेले तर त्यांच्यासाठी ते मोठे आव्हान ठरू शकते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा