शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

'पाञ्चजन्य'चा 'Amazon' वर निशाणा; म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी 2.0

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:18 IST

पाञ्चजन्यच्या नव्या अंकावर Amazon चे संस्थापक आणि अध्यक्ष जेफ बेझोस यांचा फोटो छापण्यात आला असून त्याखाली इस्ट इंडिया कंपनी असं लिहिण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देपाञ्चजन्यच्या नव्या अंकावर Amazon चे संस्थापक आणि अध्यक्ष जेफ बेझोस यांचा फोटो छापण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडीत असलेल्या पाञ्चजन्यमधून अमेरिकेची दिग्गज ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये अॅमेझॉनचा उल्लेख 'ईस्ट इंडिया कंपनी 2.0' असा करण्यात आला आहे. यापूर्वीही पांचजन्यमधून इन्फोसिसवर निशाणा साधण्यात आला होता. तसंच इन्फोसिसच्या मआध्यमातून देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात काम करत नाही ना?, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती.  

पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ३ऑक्टोबरला येणाऱ्या साप्ताहिकाचं मुखपृष्ठ ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीट केलेल्या मुखपृष्ठावर अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो छापण्यात आला असून त्याखाली #अॅमेझॉन इस्ट इंडिया कंपनी असा मथळा देण्यात आला आहे. 

यासह त्यांनी एक कॅप्शनही लिहिलं आहे. "अॅमेझॉननं असं काय चुकीचं करतंय की त्यांना लाच देण्याची गरज भारतेय? का या महाकाय कंपनीला देशातील उद्योग, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृतीसाठी लोकं धोका मानतात?," असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.  यापूर्वी इन्फोसिसवरही निशाणायापूर्वी 'पांञ्चजन्य'मधून देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसवर गंभीर आरोप करण्यात आले होते. 'इन्फोसिस देशविरोधी शक्तींशी संबंधित असून, नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगला मदत करते', असा आरोप त्यातून करण्यात आला होता. 

लाच दिल्याचा आरोपयापूर्वी काँग्रेसने थेट आरोप केला की, ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली.  पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारलं होतं की, ॲमेझॉनच्या ६ कंपन्यांनी मिळून जे ८,५४६ कोटी रूपये दिले त्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत? हा पैसा काढून कोणाला आणि कोणत्या प्रकारे दिला गेला? सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. 

दरम्यान, यानंतर एका अहवालानुसार ॲमेझॉनने आपल्या काही प्रतिनिधींविरुद्ध भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली तपास सुरू केला आहे. या संदर्भात ॲमेझॉनने वरिष्ठ कॉर्पोरेट वकिलांना रजेवर पाठवले आहे. कंपनीत भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही आणि यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असे ॲमेझॉनने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघamazonअ‍ॅमेझॉनIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार