शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीसाठी संघाचा महाराष्ट्रातही ‘हरयाणा’ मार्ग; थेट लोकांत मिसळून जनमत आजमावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:39 IST

महाविका आघाडीत इनकमिंग; ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे शरद पवार गटात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक महिन्यावर आली आहे. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनुसार, संघाने आपल्या सर्व सहकारी संघटनांशी समन्वय राखत जनतेत मिसळून थेट संपर्क साधणे सुरू केले आहे.

विभागनिहाय स्वयंसेवकांचे गट

रा. स्व. संघाने राज्यात विभागनिहाय सदस्यांचे गट नेमले असून आपापल्या भागांत हे स्वयंसेवक लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. ५-१० लोकांना एकत्र करून हे सदस्य बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत हवा तो संदेश पोहोचवत आहेत.

थेट समर्थन नाही, पण...

सूत्रांनुसार, हे सदस्य थेट भाजपचे समर्थन न करता राष्ट्रीय हितासह हिंदुत्व, सुशासन, विकास, जनकल्याणाचे मार्ग आणि सामाजिक मुद्द्यांवर लोकांशी चर्चा करत आहेत. या माध्यमातून लोकांची मते जाणून घेतल्यानंतर आपले धोरण ठरवत आहेत.

अशी केली तयारी...

स्वयंसेवकांचे असे गट तयार करण्यापूर्वी संघाने आपल्या सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून धोरण ठरविण्यासाठी राज्यात सर्व पातळीवर समन्वय बैठका घेतल्या. त्यानंतर स्वयंसेवकांचे गट नेमण्याचे निश्चित करण्यात आले.

छोट्या छोट्या बैठकांवर भर

- हरयाणात सत्ताधारी भाजपच्या विरोधात लाट असल्याचे चित्र होते. लोकांतूनही तीव्र प्रतिक्रिया होत्या. तरीही भाजपने ९० पैकी ४८ जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यामागे संघाचे नियोजन आणि राज्यभर समन्वय हेच प्रमुख कारणांपैकी एक होते. - हरयाणात या सदस्यांनी सव्वालाखाहून अधिक छोट्या बैठका घेतल्या होत्या. नेमकी हीच रणनीती आता महाराष्ट्रासाठी आखली जात आहे.

‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे शरद पवार गटात

मुंबई: शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना विधानसभेचे तिकीट देता आले नाहीतर विधानपरिषदेवर पाठविण्याचा शब्द दिला आहे. ज्योती मेटे बीड लोकसभेची निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या. त्यावेळीही त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पण, पवारांनी बजरंग सोनवणे यांना तिकीट दिले. आताही त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत प्रवेश केला.

बीडमध्ये सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते शरद पवारांच्या सोबतच राहिले आहेत. तसेच लोकसभेला बजरंग सोनवणे यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचे तिकीट कापणे कठीण आहे. अशावेळी मराठा मतदारांचे प्राबल्य असलेल्या बीड विधानसभेत ज्योती मेटे यांना प्रवेश देऊन पवारांनी ही जागा सुरक्षित केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाHaryanaहरयाणाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघVinayak Meteविनायक मेटेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस