शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:54 IST

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले प्रणव मुखर्जींचे आभार

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुखर्जींचे आभार मानले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असून संघ लोकांना जोडण्याचं काम करतो. आम्ही देशात कोणलाही शत्रू मानत नाही. भारतामाता ही सर्वांची आहे,' असं सरसंघचालक म्हणाले. 'भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, यात कोणतंही दुमत नाही. विविधतेचा सन्मान करुन एकता जपणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करायला हवी,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. 'आम्ही देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सद्भावना बाळगतो आणि मार्गक्रमण करतो. स्थापनेनंतर संघासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र तरीही संघानं आपली वाटचाल कायम राखली. आता संघ लोकप्रिय आहे. आम्ही जिथे जातो, तिथे आम्हाला सन्मान मिळतो आहे,' असंही ते म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीवरुन होणाऱ्या उलटसुलट चर्चेवरही भाष्य केलं. 'अनेक विचारांचे महापुरुष आमच्या कार्यक्रमात येतात. मात्र यावेळी कार्यक्रमाची जरा जास्तच चर्चा झाली,' असं भागवत म्हणाले. 'प्रणव मुखर्जी यांना कसं आणि का बोलावलं, याबद्दलची चर्चा निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं सरसंघचालकांनी म्हटलं.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपा