शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

नितीन गडकरींच्या 'त्या' विधानांवर मोहन भागवत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 12:00 PM

गेल्या काही दिवसांपासून गडकरींची विधानं चर्चेत

देहरादून: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. गडकरी त्यांच्या वक्तव्यांमधून अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्त्वावर निशाणा साझत असल्याची राजकीय वर्तुळात आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. षडयंत्र रचणं हा गडकरींचा स्वभाव नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये बोलत होते. नितीन गडकरी त्यांच्या विधानांमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत असल्याची चर्चा रंगली होती. याबद्दल विचारलं असता सरसंघचालकांनी गडकरींचा स्वभाव तसा नसल्याचं म्हटलं.  'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती. त्याआधी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपाच्या पराभवानंतर नितीन गडकरींनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पराभवाची जबाबदारी नेतृत्त्वाची असते. तुमचे खासदार काम करत नसेल, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असता, अशा आशयाचं विधान गडकरींनी केलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वीच, जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यामुळे गडकरी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधत असल्याची चर्चा सुरू झाली होती.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी