शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बजेटवर भारतीय मजदूर संघ नाराज; करणार देशव्यापी निदर्शनं  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 3:12 PM

मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत नोकरदारवर्गात मोठी उत्सुकता होती. मोदी सरकार काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीय आणि नोकरदांराच्या पदरी निराशाच आली.

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत नोकरदारवर्गात मोठी उत्सुकता होती. मोदी सरकार काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीय आणि नोकरदांराच्या पदरी निराशाच आली. गतवर्षी लागू केलेला 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापर्यंतच्या करमुक्तीचा स्लॅब कायम ठेवण्यात आला.  टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात न आल्याने नोकरदार वर्गाची निराशा झाली. अर्थसंकल्पावर मध्यमवर्गीय आणि नोकरदारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहयोगी संघटन असलेल्या भारतीय मजदूर संघानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पात कामगारवर्ग आणि नोकरदारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही आणि कामगारांच्या हितासाठी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. अंगणवाडी कर्मचा-यांसाठीही सरकारने काही उपयुक्त घोषणा केली नाही,  असं म्हणत भारतीय मजदूर संघाने देशव्यापी निदर्शनं करण्याची घोषणा केली आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.   काय आहे इन्कम टॅक्स स्लॅब -2.5 लाख रुपयांपर्यंत 0%2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत 5%5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत 20%10 लाख रुपयांपेक्षा जास्त 30%

काय म्हणाले जेटली - - गतवर्षी स्टॅन्डर्ड मेडिकल डिडक्शन 25 हजार रुपये होते. त्यामध्ये 15 हजारांची वाढ अरुण जेटली यांनी केली आहे. नोकरदारांना 40 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार- स्टँडर्ड डिडक्शनमुळे सरकारला महसुलात 8000 कोटी रुपयांचा तोटा होणार.- उत्पन्नापेक्षा 40 हजार कमी कर भरावा लागणार- वैद्यकीय खर्चावरील सूट 15 हजारांहून 40 हजारांपर्यंत- प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही- 250 कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांना 25 टक्के कर- कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त- ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज; याआधी 10 हजारांची मर्यादा होती- ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारांपर्यंतच्या बचतीवर कर नाही- आयकरात तब्बल 90 हजार कोटींची वाढ झाली- कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त- 19.25 लाख नवे करदाते, नोटाबंदीमुळे कर भरणारे वाढले- 1.8 कोटी नोकरीपेशा करदात्यांनी प्रत्येकी सरासरी 76 हजार रुपयांचा सरासरी कर भरला. तर 1.88 कोटी इंडिव्हिजुअल बिझनेस पर्सन्सने प्रत्येकी - सरासरी 25 हजार रुपयांचा कर भरला असे जेटली म्हणाले.- प्रत्यक्ष करात 12.5 टक्क्यांनी वाढ- यंदा 8.7 कोटी करदात्यांनी कर भरला - 250 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना 25 टक्के कर - MSME यांना कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट दिल्याने 7000 कोटी रुपये सरकारचा महसूल घटणार.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ