शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा सरकारच्या बँक खात्यांमधून 590 कोटी रुपये गायब; प्रकरणाची चौकशी CBI कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:35 IST

12 सरकारी खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार

चंदीगड: हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या बँक खात्यांमधून तब्बल 590 कोटी रुपये गायब झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता या आर्थिक घोटाळ्याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) करणार आहे. हरियाणा सरकारने यासाठी शिफारस केली असून, केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीबीआय अधिकृतपणे तपास सुरू करेल.

12 सरकारी खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या सुमारे 12 बँक खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या खात्यांमध्ये प्रत्यक्ष शिल्लक रक्कम जास्त असायला हवी होती, मात्र तपासात 590 कोटी रुपये कमी असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची चौकशी राज्य विजिलन्स विभाग आणि चंदीगड पोलिसांकडून केली जात होती. या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

तपास यंत्रणा सध्या खालील मुद्द्यांवर चौकशी करत आहे-

पैसे नेमके कुठे गेले?कोणत्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले?कोणत्या अधिकाऱ्यांचा किंवा बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे?फेक कंपन्यांद्वारे पैसे वळवले का?

दोन बँकांमधील खात्यांतून रक्कम गायब

सरकारी विभागांची 10 खाती IDFC First Bank मध्ये, तर 2 खाती AU Small Finance Bank मध्ये होती. या खात्यांमधूनच टप्प्याटप्प्याने रक्कम वळवण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे.

बनावट कंपन्या तयार करून पैसे ट्रान्सफर

तपासात मुख्य आरोपीने अनेक बनावट कंपन्या आणि फर्म तयार केल्याचे समोर आले आहे. सरकारी खात्यांमधील पैसे या बनावट कंपन्यांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. या बनावट कंपन्यांमध्ये आरएस ट्रेडर्स, कॅप को फिटेक सर्विसेस, एसआरआर प्लॅनिंग गुरु प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वास्तिक देश प्रोजेक्ट नावांचा समावेश आहे. या कंपन्यांची खाती फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठीच तयार करण्यात आली होती, असा संशय आहे.

फेक डेबिट मेमो वापरून घोटाळा

या घोटाळ्यात फेक डेबिट मेमो तयार करण्यात आले होते. त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी खात्यांमधून पैसे काढून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. 23 फेब्रुवारी रोजी हरियाणा विजिलन्स विभागाने या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती.

सरकारी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांवर संशय

या प्रकरणात काही सरकारी अधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मुद्दा हरियाणा विधानसभा सभागृहातही चर्चेला आला होता. विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी हा गंभीर घोटाळा असल्याचे सांगत सरकारकडून कारवाईची माहिती मागितली होती. तर, मुख्यमंत्री यांनी सांगितले की, गडबड लक्षात येताच तपास सुरू केला आणि तपासातूनच हा घोटाळा उघडकीस आला. दोषी अधिकारी किंवा बँक कर्मचारी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल

English
हिंदी सारांश
Web Title : Haryana government bank accounts: ₹590 crore vanishes, CBI probe ordered.

Web Summary : ₹590 crore vanished from Haryana government accounts, prompting a CBI investigation. 12 accounts across two banks showed discrepancies. Fake companies and debit memos were used to transfer funds. 15 arrests have been made, with suspicion of official and bank staff involvement.
टॅग्स :Haryanaहरयाणाbankबँकfraudधोकेबाजी