शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी - तामिळनाडूत एका बेनामी खात्यात सापडलं 246 कोटी रुपयांचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:28 IST

नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळलेते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे एका अधिकाऱ्याने सांगितलेनोटाबंदीनंतर जमा करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी रक्कम

चेन्नई, दि. 9 - नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या व बँकेत त्या जमा करण्यासाठी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरची मुदत देण्यात आली. या काळात लाखो खात्यांमध्ये काही हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यासाठी जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून एकाच खात्यात 246 कोटी रुपये जमा करणे हा त्यातलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये असंही लक्षात आलं आहे की 441 खात्यांमध्ये 240 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु या खातेदारांची बँकांकडे नीट माहिती नसल्याचे समोर आले आहे. मोठ्या व संशयित रकमांच्या व्यवहारांची उकल करण्यासाठी प्राप्तीकर खात्याने जवळपास 27,739 खातेदारांना नोटिसा पाठवल्या आहेत.

विशेष म्हणजे एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळले व ते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे प्राप्तीकर खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीच्या काळात जमा करण्यात आलेल्या रकमांमधील ही सगळ्यात मोठी रक्कम असल्याचे तो म्हणाला. आम्ही या खातेदाराला नोटीस पाठवली आणि सदर खातेदार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर व दंड भरण्यास तयार झाल्याचे प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संशयित आर्थिक व्यवहारांसदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्राप्तीकर खात्याला काही माहिती दिली असून त्याआधारे खात्यांच्या छाननीचं काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 27,739 जणांना नोटिसा पाठवल्या असून 18,220 जणांकडून प्रतिसाद आला आहे. उरलेल्या सुमारे 9500 खातेदारांनी अनेक वेळा नोटिसा देऊनही प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या बँकांनी केवायसी किंवा नो युवर कस्टमर यांचे पालन केलेले नाही त्यांना ग्राहकाची ओळख पटवण्यात समस्या येत असून बँकांनी अशा प्रकरणांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी असेही सांगण्यात येत आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांनी काही ग्राहकांना काला पैसा बेनामी खात्यात ठेवण्यास मदत केली असावी असा संशय आहे. सुमारे 3,600 कोटी रुपयांची रक्कम होईल इतकी संशयित खाती छाननीत आढळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीनंतर ज्यांनी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरली आहे, अशांची आता छाननी करण्यात येत आहे.

टॅग्स :Note BanनोटाबंदीTamilnaduतामिळनाडूCrimeगुन्हा