रोटरी क्लबतर्फे तपासणी
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:57+5:302016-02-02T00:15:57+5:30
हॅलो १ साठी...

रोटरी क्लबतर्फे तपासणी
ह लो १ साठी...जळगाव- रोटरी क्लब, जळगावतर्फे फिजीओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ.अली इराणी, डॉ.पी.व्ही.गोळे व इतर ११ फिजीओथेरपीस्ट यांनी १३० रुग्णांची तपासणी केली. उद्घाटन प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, डॉ.इराणी, सुरेश केसवाणी यांच्याहस्ते झाले. डॉ.शांताराम तळेले, डॉ.शशिकांत गाजरे, शांती दमानी प्रमुख अतिथी होते. यशस्वीतेसाठी डॉ.अमित तळेले, डॉ.गजानन पाटील, डॉ.व्ही.ए.नेमाडे व सहकार्यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार वितरणजळगाव- समता शिक्षक परिषदेतर्फे ७ रोजी दुपारी १२.३० ते ४.३० वाजता अल्पबचत भवनात गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे संस्थापक डी.के.अहिरे, अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोळकर, शिक्षण संचालक महावीर माने, उपसंचालक भगवान सूर्यवंशी, प्राचार्य अनिल झोपे, आय.सी.शेख, शिक्षणाधिकारी देवीद९ास महाजन आदी उपस्थित राहतील. भुसावळ बोदवडबसबाबत मागणीजळगाव- भुसावळ आगारातून रात्री ८.१० वाजता सुटणारी भुसावळ-बोदवड एसटी बस कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही बस काही दिवसांपूर्वी कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांना खाजगी बसने नाइलाजाने जावे लागते. बोदवड विभागाचे चांगले उत्पन्न असतानाही अनेक बसफेर्या अचानक रद्द केल्या जातात, असेही निवेदनात म्हटले आहे. सहकार मंत्र्यांचा दौराजळगाव- सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे ३ रोजी जिल्हा दौर्यावर येत आहे. ते ३ रोजी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर मुंबई सीएसटी येथून अमृतसर एक्सप्रेसने पोहोचतील. तेथून धुळे येथे शासकीय वाहनाने प्रयाग करतील. सायंकाळी ६ वाजता ते धुळे येथून चाळीसगावकडे येतील. पुणतांबेकर यांना आदरांजलीजळगाव- जे.के.स्कूल, मोहाडी रोड येथे साहित्यिक डॉ.शंकर पुणतांबेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. कृष्णा श्रीवास्तव यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.