शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

हेराफेरीच्या पैशांमधून रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमध्ये घेतला फ्लॅट, ईडीचा न्यायालयात गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 1:46 PM

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट झाला आहे.

ठळक मुद्देसोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल ऑनर असल्याचा ईडीचा न्यायालयात दावाफ्लॅटची किंमत सुमारे 16 कोटी 80 लाख रुपये

नवी दिल्ली -  सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट झाला आहे. रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल ऑनर असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 16 कोटी 80 लाख रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे. रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय मनोज अरोडा यांच्याविरोधा अजामिनपात्र वॉरंटसाठी ईडीने अरविंदा कुमार यांच्या विशेष न्यायालयात धाव घेतली होती. अरोडा हा ईडीने टाकलेल्या धाडींनंतर फरार झालेला आहे. दरम्यान, लंडनमध्ये खरेदी करण्यात आलेली संपत्ती मनी लाँड्रिंगमधील पैशातून खरेदी करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.  मनोज अरोडा हा या व्यवहाराचा साक्षीदार आहे. तसेच या व्यवहाराविषयी सर्व काही माहित आहे, असा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.   हा फ्लॅट फरार संजय भंडारी याने 16 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केला होता. तसेच वाड्रा यांचे नियंत्रण असलेल्या फर्मने हा फ्लॅट त्याच किमतीत भंडारी याच्याकडून खरेदी केला होता. भंडारीविरोधात ऑफिशियर सिक्रेट अॅक्ट अंतर्गत 2016 साली गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, संजय भंडारी हा नेपाळमार्गे देशाबाहेर पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने भंडारीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील मालमत्ता जप्त केल्या होता. मात्र भंडारीच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

 तसेच मनोज अरोडा हासुद्धा दिल्ली आणि बंगळुरूस्थित त्याच्या संपत्तीवर ईडीने छापे टाकल्यापासून फरार आहे.  दरम्यान अरोडा हा अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही हजर राहिलेला नाही, असे ईडीने त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंटची मागणी करताना कोर्टात सांगितले आहे. रॉबर्ट वाड्रा प्रकरणातील अनेक व्यवहारांच्या देवाणघेवाणीची माहिती, अरोडाला असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ईडीने म्हटले आहे.  

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय