रस्ते जलमय, अनेक ट्रेन रद्द, नद्या तुडुंब भरल्या... तमिळनाडूत पावसाचा कहर, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:26 AM2023-12-20T11:26:29+5:302023-12-20T11:41:24+5:30

मुसळधार पाऊस पाहता तिरुनेलवेली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Roads waterlogged, many trains cancelled, rivers flooded... flooded due to heavy rains Tamil Nadu | रस्ते जलमय, अनेक ट्रेन रद्द, नद्या तुडुंब भरल्या... तमिळनाडूत पावसाचा कहर, पाहा Video

रस्ते जलमय, अनेक ट्रेन रद्द, नद्या तुडुंब भरल्या... तमिळनाडूत पावसाचा कहर, पाहा Video

नवी दिल्ली: ( Marathi News ) दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी पाणी साचले आहे. परंतु तिरुनेलवेली आणि थुथुकुडीमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. मंगळवारपर्यंत या दोन जिल्ह्यांमध्ये 10 मृत्यूची नोंद झाली आहे.

मुसळधार पाऊस पाहता तिरुनेलवेली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर थुथुकुडीमध्ये सर्वसाधारण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच टेंकसी येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून येत आहे.

रेल्वेलाही फटका

तामिळनाडूत मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवरही होत आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. ट्रेन क्रमांक 06643 नागरकोइल - तिरुनेलवेली एक्सप्रेस स्पेशल आणि ट्रेन क्रमांक 06643 नागरकोइल - तिरुनेलवेली एक्सप्रेस स्पेशल पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्याच वेळी, ट्रेन क्रमांक 06640 कन्याकुमारी - पुनालूर एक्स्प्रेस कन्याकुमारी आणि नागरकोइल दरम्यान रद्द करण्यात आली आहे आणि नागरकोइल येथून 15.32 वाजता नियोजित सुटण्याच्या वेळेस निघेल. 

अनेक भाग पुराच्या विळख्यात-

मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील अनेक भाग पुराच्या विळख्यात आहेत. या सर्व भागात मदतकार्य सुरू आहे. सततच्या पावसामुळे तिरुनेलवेली जिल्ह्यात मणिमुथर धबधबा कोसळला आहे. त्याचवेळी ओटापीदारमजवळील मदुराईला जाणारा लिंक रोड पूर्णपणे तुटला आहे.

Web Title: Roads waterlogged, many trains cancelled, rivers flooded... flooded due to heavy rains Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.