शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

रोड टॅक्स वाढविल्यामुळे नऊ राज्यांत कार महागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:57 AM

आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे.

मुंबई/नवी दिल्ली : आधीच मंदीने ग्रासलेल्या वाहन उद्योगाला नऊ राज्यांनी रोड टॅक्स वाढवून आणखी एक दणका दिला आहे. रोड टॅक्समध्ये वाढ झाल्यामुळे या राज्यांतील प्रवासी वाहनांच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम म्हणून वाहन विक्री आणखी घटली आहे.रोड टॅक्समध्ये वाढ करणाऱ्या राज्यांत पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर आणि बिहार यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीच्या उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, रोड टॅक्स वाढल्यामुळे वाहनांच्या किमती ५ हजार ते ५७ हजार रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.सूत्रांनी सांगितले की, जम्मू-काश्मिरातील रोड टॅक्समुळे (९ टक्के) मारुती सुझुकीच्या आॅल्टो८०० कारची किंमत २२,९०० रुपयांनी वाढली आहे. सुरक्षा व उत्सर्जन नियमांच्या पालनासाठी गुंतवणूक करावी लागल्यामुळे गाडीची एकूण किंमत ६३ हजारांनी वाढली आहे. सियाजची किंमत ९८ हजारांनी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आॅल्टोची विक्री २७ टक्क्यांनी घसरली आहे.याशिवाय या वित्त वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत पंजाबात छोट्या कारची विक्री २८ टक्क्यांनी, बिहारात २७ टक्क्यांनी आणि उत्तराखंडमध्ये २६ टक्क्यांनी घसरली आहे.>अशाने वाहनांची विक्री घटणारचमारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, आॅल्टोसारख्या गाड्यांच्या किमतीही ४५ ते ५० हजार रुपयांनी वाढवाव्या लागत असतील तर दुसरी काय अपेक्षा केली जाऊ शकते? विक्री घटणारच. विक्री आधीच कमी झालेली असताना राज्ये रोड टॅक्स ५ टक्क्यांपर्यंत वाढवीत आहेत. वाढलेल्या किमती, कर्ज सुविधांची अत्यल्प उपलब्धता आणि सुरुवातीला जमा कराव्या लागणाºया रकमेतील वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून कारच्या किफायतशीरपणावर परिणाम होणे अटळ आहे.