देवळ्यात रस्ता सुरक्षा अभियानात म्
By Admin | Updated: January 29, 2016 22:44 IST2016-01-29T22:28:07+5:302016-01-29T22:44:59+5:30
ाार्गदर्शन शिबिर

देवळ्यात रस्ता सुरक्षा अभियानात म्
ाार्गदर्शन शिबिर
मालेगाव : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देवळा येथील शासकीय विश्रामगृहात २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी सुरक्षित वाहन चालविणे, आवश्यक कागदपत्रे, सिट बेल्टचे महत्व, हेल्मेटचे महत्व आदि विषयावर मार्गदर्शन केले. नागरिकांना रहदारीची चिन्हे, नियमांची पत्रके वाटण्यात आली. कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल कदम, दिनेश सूर्यवंशी, मोतीलाल खैरनार, अंबादास सोनवणे आदि उपस्थित होते. सूत्रसंचलन खंदारे यांनी केले.
फोटो फाईल नेम : २९एमजेएएन०५.जेपीजी
फोटो कॅप्शन : देवळा येथील विश्रामगृहात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक घाटगे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, योगेश मोरे, अनिल कदम, दिनेश सूर्यवंशी आदि.