नामपूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:18+5:302015-02-14T23:52:18+5:30
नामपूर : नामपूर भागातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. देखभालीचा अभाव, निकृष्ट काम व पैशांचा अपहार यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खड्यांमध्ये हरवलेले आहेत. प्रचंड खड्डे, अदृश्य झालेले डांबर व खोल गेलेल्या साइडप्या यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य झालेले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना खेद ना खंत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नामपूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
न मपूर : नामपूर भागातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. देखभालीचा अभाव, निकृष्ट काम व पैशांचा अपहार यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते खड्यांमध्ये हरवलेले आहेत. प्रचंड खड्डे, अदृश्य झालेले डांबर व खोल गेलेल्या साइडप्या यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य झालेले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे निरपराधांना जीव गमवावा लागला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना खेद ना खंत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.मालेगाव-नामपूर-मुल्हेर-अहवा हा राज्य रस्ता आहे. या रस्त्याचे नूतनीकरण होऊन फक्त दोन वर्ष झाले आहेत. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावर मोर्यांची कामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा खूपच सुसार आहे. अजंग, वडनेर या मोर्यांची कामे सुरु आहेत. जवळजवळ एक वर्षापासुन ही कामे सुरु आहेत. मोर्यांची कामे केलीत मात्र अजूनही या मोर्यांना सरंक्षक कठडे पुर्ण करण्याचे काम ठेकेदाराने केले नाही. सदर ठेकेदार या मोर्यांवरील वहातुक केव्हाही सुरु करतो व केव्हाही बंद करतो. मोरीवरुन प्रवास करु नये म्हणुन मातीचे स्पिड ब्रेकर तयार करुन ठेवले आहेत. प्रवास करु नये येथे दगड लावले जातात व काटेही ठेवली जातात. मात्र तब्बल वर्षभरापासून हे काम. सुरु असल्याने वाहनचालक या कामाला कंटाळले आहेत. या मोर्यांवरुन वहातुक करताना दिसतात. मात्र नित्कृष्ट काम व संरक्षक कठड्याविना असलेले हे काम अत्यंत धोकेदायक आहे. या मोर्यांवरुन वहातुक सुरु असल्याने नामपूर येथील कांदा व्यापारी बंटीशेठ नेर यांचा कांद्याने भरलेला कंटनेर या मोरीवरुन खाली कोसळला. लाखो रुपयाचे नुकसान झाले. अनेक वेळा काही दुचाकीस्वारांचा गाडीवरुन तोल सुटल्याने या ठिकाणी अपघातग्रस्त व्हावे लागले आहे.आसखेडा गावाजवळ पुलाचे काम गेल्या दिड-दोन महिन्यापूर्वी हे काम सुरु झाले. मोरी अथवा पुलाचे काम करावयाचे असेल तर वहातुकीसाठी पर्यायी रस्ता करुन देणे ही सुविधा संबंधित ठेकेदाराला करुन द्यावी लागते. आसखेड्याजवळील पुलाचे काम सुरु झाले. पर्यायी रस्त्यांची उपलब्धता या ठेकेदाराने कोठलीही केली नाही. मात्र एस.टी. स्टॅण्डजवळुन वाघळे रस्त्याकडून आसखेडा गावातून ही वहातुक सुरु झाल्याने आसखेडकरांना या वहातुकीमुळे अपघात व धुळ प्रदुषणाच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. म्हणुन सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही वहातुक थांबवली.