भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:42 IST2023-09-28T11:41:34+5:302023-09-28T11:42:37+5:30

एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

road accident in nawada bihar uncontrolled truck crushed 4 laborers 3 died on the spot | भीषण अपघात! बिहारमध्ये ट्रकने 4 मजुरांना चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

फोटो - hindi.news18

बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. नवादा येथे एका ट्रकने चार जणांना चिरडले, त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नवादा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नवादा गया रोडवरील सोभिया कृषी फार्मजवळ केवट नगर येथे घडली. ट्रक गयाहून नवादा येथे येत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली, यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची अधिक माहिती देताना प्रद्युम्न या मजुराने सांगितले की, दररोज प्रमाणे सर्वजण नवादा येथे काम करण्यासाठी एकत्र जात होते. एकूण पाच जण एकत्र जात होते. त्याचवेळी नवादा रस्त्यावरून भाजीपाला भरलेले पिकअप वाहन गेलं. त्याला बाजारात जाण्याचा रस्ता विचारला. 

गयाच्या दिशेने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने सर्वांना चिरडलं आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मजूर केवट नगर येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये आकाश कुमार, समीर कुमार, प्रल्हाद चौहान यांचा समावेश असून ते सर्वजण पहाटे मंडीत कामासाठी जात होते. 

या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको केला. घटनेनंतर शहर पोलीस आणि सदर बीडीओ घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: road accident in nawada bihar uncontrolled truck crushed 4 laborers 3 died on the spot