शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Road Accident: पोलिसांच्या कारचा भीषण अपघात, 4 पोलिस आणि एका आरोपीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:12 IST

गुजरात पोलिसांची कार दिल्लीहून एका आरोपीला घेऊन गुजरातकडे जात असताना राजस्थानच्या जयपूरमध्ये अपघात झाला.

जयपूर: राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील कोतपुतली भागात सोमवारी मध्यरात्री एक मोठा अपघात झाला. भाब्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक फॉर्च्युनर कार दुभाजकावरील झाडावर आदळली. या अपघातात चार पोलिस आणि एका आरोपीचा मृत्यू झाला. ही कार दिल्लीहून गुजरातकडे जात होती. अपघातात ठार झालेले सर्व पोलिसगुजरात पोलिसांचे होते. भाब्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंझार मोरजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी गुजरात पोलिसांचे चार पोलीस दिल्लीहून एका आरोपीला पकडल्यानंतर कारने परत गुजरातला जात होते. दरम्यान, भाब्रू परिसरात निंजार वळणावर त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावरील झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चार पोलिस आणि आरोपीचा मृत्यू झाला.

अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाहीअपघाताची माहिती मिळताच भाब्रू पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी सर्व मृतदेह स्थानिक शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. हा अपघात कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. भाब्रू पोलिसांनी गुजरात पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. भाब्रू पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानjaipur-pcजयपूरGujaratगुजरातPoliceपोलिस