शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:13 IST

देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे

ठळक मुद्दे12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहेदरवर्षी 5 लाखांहून अधिक रस्ते अपघात देशात होतात मृतांमध्ये सर्वाधिक युवकांचा समावेश असतो

नवी दिल्ली - देशात होणारे रस्ते अपघात अन् त्यातील जीवितहानी रोखू शकलो नाही हे माझ्या मंत्रालयाचं आणि माझं अपयश आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कबुली दिली आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरींनी एका सत्रात हे विधान केलं आहे. त्याचसोबत देशातील नवीन रस्ते योजनांबाबतही गडकरींनी दिलखुलास उत्तरं दिली.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं काम सुरु आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या मंत्रालयाने अनेक क्षेत्रात यश मिळविले. पण मागील 5 वर्षात रस्ते दुर्घटना कमी करण्यास अपयश आले. प्रत्येक वर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. मृतांपैकी 18-35 या वयोगटातील जवळपास 65 टक्के लोक आहेत. नवीन मोटार वाहन कायदा एक वर्षापासून राज्यसभेत अडकला होता. तो अलीकडेच पारित झाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे. एक व्यक्ती तीन वेगवेगळ्या शहरांमधील परवाने ठेवतो. त्याचसोबत बस ड्रायव्हरला चांगले प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. 50 लोकांना बसमध्ये बसवून तो गाडी चालवत असतो. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण शाळा उघडण्याची तयारी करतोय. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंडाची रक्कम वाढविली आहे या भीतीमुळे वाहन चालक रस्त्यावर गाडी चालविताना वाहतूक नियमांचे पालन करेल असंही नितीन गडकरींनी सांगितले. 

दरम्यान, पाच कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 40 किलोमीटर प्रतिदिन असं रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 32 किमी असं सुरु आहे. यावर्षी 40 किमी होईल. तसेच 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं ध्येय आमचं आहे. नवीन नवीन योजनांच्या माध्यमातून रोजगारासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. आव्हानात्मक स्थिती असूनही आम्ही मार्ग काढण्याचं काम करतोय. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातMumbaiमुंबईhighwayमहामार्ग