शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आर.के. नगर पोटनिवडणुकीत दिनकरन यांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 18:21 IST

वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे.

 चेन्नई - वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी दणदणीत विजय मिळवला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिनकरन हे शशिकला यांचे पुतणे आहेत.दरम्यान, मतमोजणीत मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन यांना आपणच अम्मांचे खरे वारस असून, तामिळनाडूमधील सरकार पुढच्या तीन महिन्यांत कोसळेल, असा दावा केला होता.  झालेल्या एकूण 1 लाख 96 हजार 889 मतदानापैकी दिनकरन यांना 89 हजार 13 मते मिळाली. त्यांनी एकूण 40 हजार 707 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अण्णा द्रमुकचे उमेदवार ई. मधुसुधनान यांना 48 हजार 306 मते मिळाली, तर द्रमुकच्या मारुदू गणेश यांना 24 हजार 651 मते मिळाली.  भाजपाचे कारू नागराजन यांना 1417 मते मिळाली.

दरम्याान, मतमोजणीमध्ये सकाळीच मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन म्हणाले होते की, आर.के. नगर मतदारसंघातून अम्मा निवडणूक लढत असत. या पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेल्या कौलाचा विचार केला तर एआयएडीएमके आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे भविष्य काय आहे, हे निश्चित झाले आहे. मी आर.के. नगर मतदारसंघातील जनता आणि पक्षाच्या समर्थकांचे आभार मानतो.  आर.के. नगर मतदारसंघातील मतमोजणीमध्ये सहाव्या फेरीअखेर  टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मोठी आघाडी घेतली होती, तेव्हापासून त्यांच्या विजय निश्चित मानण्यात येत होता. दरम्यान, दिनकरन यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. तर अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते संतप्त झाले असून. त्यांनी मारहाण करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. तसेच इव्हीएमला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाला आहे.  

आर.के.नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत दिनकरन यांची सरशी झाल्याने अण्णा द्रमुक पक्षातील बंडाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच दिनकरन यांचा विजय हा पलानीस्वामी आणि पनिरसेल्वम यांच्यासाठी धक्का मानण्यात येत आहे.

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूकIndiaभारत