शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:26 IST

Rambabu Singh : सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत.

बिहारच्या सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे त्यांना गोळी लागली. आज त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी आणलं जाईल. मंगळवारी तेजस्वी यादव यांनी रामबाबू सिंह यांचे मोठे भाऊ अखिलेश कुमार यांच्याशी व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

तेजस्वी यादव अखिलेश कुमार यांना म्हणाले की, "नमस्कार, सर्वांना अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. खंबीर राहा. संपूर्ण बिहार, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे." तेजस्वी यादव यांनी रामबाबू सिंह हे किती वर्षांचे होते? असा प्रश्न विचारला. यावर अखिलेश यांनी २७ वर्षे उत्तर दिलं. तसेच शहीद जवानाच्या पार्थिवाबद्दल विचारलं की, ते पाटण्याला कधी पोहोचेल? यावर त्यांनी  मंगळवारी रात्री तिथून निघेल असं सांगितलं.

"तुम्हा सर्वांना सलाम..."

व्हिडीओ कॉलवरील संभाषणादरम्यान,  तेजस्वी यादव यांनी विचारलं,  तुमच्या कुटुंबातील कोणी तिथे आहे का? यावर अखिलेश यांनी नाही असं उत्तर दिलं. तेजस्वी यादव म्हणाले, "आम्ही विमानतळावर असू. तुम्हा सर्वांना सलाम." रामबाबू सिंह गेल्या महिन्यात १० एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू झाले होते. सोमवारी कुटुंबाला फोन आला की ते शहीद झाले आहे. रामबाबू सिंह यांचं लग्न अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालं होतं. 

अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...

शहीद जवान रामबाबू सिंह हे सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील रामविचार सिंह हे हरिहरपूर पंचायतीचे उपसरपंच होते. रामबाबू सिंह यांचे भाऊ अखिलेश सिंह हे झारखंडमधील हजारीबागमध्ये लोको पायलट म्हणून काम करतात. रामबाबू यांचे सासरे सुभाष चंद्र शर्मा यांनी सांगितलं की, त्यांचे जावई भारताची एअर डिफेंस सिस्टम S-400 चालवत होते. १० एप्रिल रोजी ते जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्युटीवर रुजू झाले. त्याची मुलगी धनबादमध्ये होती. काल (सोमवार) दुपारी १.३० वाजता, लष्कर मुख्यालयातून फोन आला की गोळी लागली आहे. यानंतर रामबाबू शहीद झाल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवPakistanपाकिस्तान