शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण महिला, तिला झालेली अटक भयावह" काँग्रेसनेही घेतली वादात उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 12:16 IST

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये आणि कंगनावरील कारवाईनंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकारणास सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसने रिया चक्रवर्तीवर झालेल्या कारवाईला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देरिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला तिला झालेली अटक ही भयावह घटना तसेच तिने कुठलाही आर्थिक गुन्हा केलेला नाही

कोलकाता - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून पेटलेल्या वादाने गेल्या तीन महिन्यांमध्ये रोज नवनवी वळणे घेतली आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये आणि कंगनावरील कारवाईनंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकारणास सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसने रिया चक्रवर्तीवर झालेल्या कारवाईला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी सुरू केली आहे. रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच सुशांतला न्याय म्हणजे बिहारला न्याय अशी व्याख्या करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अधीररंजन चौधरी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर चौधरी यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान त्यांनी रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचे सांगितले. तसेच रियाचे वडील हे लष्करामधून निवृत्त झालेले अधिकारी असून, त्यांनी अनेक वर्षे देशाची सेवा केला. मात्र आज ते आपल्या दोन मुलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही आहेत, अशी खंत अधीररंजन चौधरी यांनी व्यक्त केली.

तसेच रिया चक्रवर्तीला झालेली अटक ही भयावह घटना असल्याचेही ते म्हणाले. रिया चक्रवर्तीने कुणालाही आत्महत्या किंवा हत्येसाठी भाग पाडले  नसल्याचे, तसेच तिने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा दावाही ररंजन चौधरी यांनी केला आहे. रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केवळ आपल्या राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली भूमिका निभावून नेली आहे. मात्र या समुद्र मंथनातून त्यांनी अमृताऐवजी अंमली पदार्थांचा शोध लावला आहे, असा टोला अधीररंजन चौधरी यांनी लगावला."निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट केलं आहे. "सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं" असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे.  बिहारमध्ये ना भुले है! ना भुलने देंगे! असं लिहिलेले स्टीकर्स भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले 30 हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :congressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण