शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जड्डूची पत्नी आमदार तर बहिणीची वाढली ताकद; २०२४ ला रंगणार वहिनी vs नणंद 'सामना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:19 IST

भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर येथून आमदार आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर येथून आमदार आहे. मागील वर्षी पार पडलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ती भाजपच्या तिकिटावर निवडून आली. निवडणुकीच्या रणधुमाळीत जडेजा कुटुंबात राजकीय कलह पाहायला मिळाला होता. असाच संघर्ष आगामी निवडणुकीत दिसण्याची चिन्हं आहेत. कारण जड्डूची बहीण नयनाबा जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने नयनाबा जडेजा हिच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली असून तिला राजकोट शहर आणि जिल्हा सेवा दलाचे प्रमुख बनवले आहे. नवी जबाबदारी मिळाल्यावर पुन्हा एकदा नव्याने काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे नयनाबाने सांगितले. नयनाबाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये सेवा दलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांचेही आभार मानले आहेत.

नणंदेचा पराभव करून रिवाबाने मिळवला विजयनयनाबा हिच्यावर मोठी जबाबदारी देऊन काँग्रेसने तिचा मान वाढवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपमधून आमदार झालेली रिवाबा जडेजा भाजपचा प्रचार करणार, तर तिची नणंद नयनाबा पुन्हा एकदा काँग्रेसचा प्रचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत वहिनी आणि नणंद यांच्यात राजकीय सामना रंगला होता. पण क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा प्रचंड मताधिक्याने विजयी झाली होती.  जडेजाच्या घरातच 'कॉंग्रेस vs भाजप'रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहे. तिने या आधी देखील संघटन मजबुतीसाठी विविध पदांवर काम केले. आता ती जिल्हा महिला अध्यक्ष राजकोट महिला सेवा दलाची जबाबदारी सांभाळणार आहे. राजकोटच्या राजकारणात ती खूप सक्रिय आहे. काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांनी ही नवीन जबाबदारी नयनाबाला दिली आहे. गुजरात प्रदेश महिला सेवा दलाच्या प्रमुख प्रगती बेन अहिर यांनी नियुक्ती झाल्यानंतर नयनाबाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर संपूर्ण राजकोटमध्ये संघटना मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे नयनाबाने सांगितले.

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाcongressकाँग्रेसBJPभाजपाGujaratगुजरातMLAआमदार