शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Rivaba Jadeja: "अशी फिल्डिंग कधीच केली नसशील", मोदींनी वाढवला होता जड्डूचा उत्साह; रिवाबाने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:44 IST

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी राजकारणात पदार्पण केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. रिवाबा या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यांनी जामनगर उत्तरमधून मोठा विजय मिळवून विधानसभेत प्रवेश मिळवला आहे. रिवाबा या भाजपच्या तिकिटावर 53 हजार 570 मतांनी विजयी झाल्या. एएनआयशी बोलताना रिवाबा यांनी पती रवींद्र जडेजाचे कौतुक केले. यासोबतच निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पतीसोबत झालेल्या संभाषणाचाही खुलासा केला आहे.

रिवाबा यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "पती जडेजा यांनी संपूर्ण प्रचारात त्यांना साथ दिली. या विजयाचे श्रेय मला त्यांनाही द्यायचे आहे. माझा नवरा म्हणून ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला प्रेरणा दिली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."

मोदींनी वाढवला होता जड्डूचा उत्साहरिवाबा यांनी आणखी सांगितले की, त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता आणि जेव्हा पंतप्रधान मोदी आले तेव्हा त्यांनी हसत खेळत सांगितले की रवींद्र, तुम्ही याआधी अशी फिल्डिंग कधीच केली नसावी. ते (रवींद्र जडेजा) माझ्यासाठी जे काही करू शकत होते, ते त्यांनी केले.

पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा होता रिंगणातरिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले होते. या निवडणुकीतील त्यांच्या विजयाचा जामनगरमध्ये जल्लोष करण्यात आला. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाबद्दल भाष्य करायचे झाले तर, दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. या ब्रेकमध्ये त्यांनी उघडपणे पत्नीचा निवडणुकीत प्रचार केला. विजयानंतर देखील जल्लोष करताना जडेजा पाहायला मिळाला. या निवडणुकीसाठी जडेजाने पूर्ण ताकद लावली होती, याच मेहनतीच्या जोरावर रिवाबा आमदार झाल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ravindra jadejaरवींद्र जडेजाNarendra Modiनरेंद्र मोदीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघGujaratगुजरात