Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:32 IST2025-10-17T20:30:44+5:302025-10-17T20:32:34+5:30
Rivaba Jadeja Which Ministry: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. यात सर्वाधिक खाती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडेच आहेत.

Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
Rivaba Jadeja Portfolio: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. दुपारी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री खातेवाटपही करण्यात आले. कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. तर कनुभाई मोहनलाल देसाई यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना शिक्षणाशी संबंधित खाते देण्यात आले आहे.
रिवाबा जडेजा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण हे खाते देण्यात आले आहे. डॉ. प्रद्युमन गुणाभाई वाजा हे शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
अर्थ, नगर विकास ही दोन्ही महत्त्वाची खाती कनुभाई देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. जितेंद्र वाघाणी हे गुजरातचे कृषिमंत्री बनले आहेत.
गुजरातमधील नवीन मंत्री आणि त्यांची खाती
मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई रजनीकांत पटेल -सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा आणि प्रशिक्षण, नियोजन, अनिवासी गुजराती विभाग, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन, रस्ते आणि इमारत व भांडवली प्रकल्प, नर्मदा, कल्पसर, खाण आणि खनिजे, बंदर, माहिती आणि प्रसारण. सर्व धोरणे आणि इतर मंत्र्यांना वाटप न केलेले विषय.
उपमुख्यमंत्री हर्ष रमेशकुमार संघवी - गृह, पोलीस गृहनिर्माण, तुरुंग, सीमा सुरक्षा, गृह रक्षक दल, ग्राम रक्षक दल, नागरी संरक्षण, दारूबंदी आणि उत्पादन शुल्क, वाहतूक, विधी आणि न्याय, क्रीडा आणि युवा सेवा, सांस्कृतिक कार्य, स्वैच्छिक संस्थांचे समन्वय, उद्योग, मीठ उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मुद्रण आणि लेखनसामग्री, पर्यटन आणि तीर्थ विकास, नागरी विमान वाहतूक.
कॅबिनेट मंत्री
3) कनुभाई मोहनलाल देसाई - वित्त, शहरी विकास आणि शहरी गृहनिर्माण
4) जितेन्द्रभाई सवजीभाई वाघाणी - कृषी आणि शेतकरी कल्याण, सहकार, मत्स्यपालन, पशुपालन आणि गो संवर्धन
5)ऋतिकेश गणेशभाई पटेल - ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स, पंचायत आणि ग्रामीण गृहनिर्माण, वैधानिक आणि संसदीय कार्य
6) कुनवरजीभाई मोहनभाई बावलिया - श्रम, कौशल्य विकास आणि रोजगार, ग्रामीण विकास
7) नरेशभाई मगनभाई पटेल - आदिवासी विकास, खादी, ग्रामोद्योग आणि ग्रामीण उद्योग
8) अर्जुनभाई देवाभाई मोढवाडिया -वन आणि पर्यावरण, हवामान बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञान
9)डॉ. प्रद्युमन गुणाभाई वाजा - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण
10) रमणभाई भीखाभाई सोलंकी -अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार
राज्य मंत्री
1) ईश्वरसिंह ठाकोरभाई पटेल - जलसंपदा, पाणी पुरवठा (स्वतंत्र प्रभार)
2) प्रफुल छगनभाई पंसेरिया - आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण (स्वतंत्र प्रभार)
3) डॉ. मनीषा राजीवभाई वकील - महिला आणि बाल विकास (स्वतंत्र प्रभार), सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण (राज्य मंत्री)
4) परशोत्तमभाई ओधवजीभाई सोलंकी - मत्स्यपालन
5) कांतिलाल शिवलाल अमृतिया - श्रम, कौशल्य विकास आणि रोजगार
6) रमेशभाई भुराभाई कटारा - कृषी आणि शेतकरी कल्याण, सहकार, पशुपालन आणि गो-संवर्धन
7) दर्शनाबेन मुकेशभाई वाघेला - शहरी विकास आणि शहरी गृहनिर्माण
8) कौशिकभाई कांतीभाई वेकारिया - विधी आणि न्याय, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स, वैधानिक आणि संसदीय कार्य
9) प्रविणकुमार गोर्धनभाई माली - वन आणि पर्यावरण, हवामान बदल, वाहतूक
10) डॉ. जयरामभाई चेमाभाई गामित - क्रीडा आणि युवा सेवा, सांस्कृतिक कार्य, स्वैच्छिक संस्थांचे समन्वय, उद्योग, मीठ उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मुद्रण आणि लेखनसामग्री, पर्यटन आणि तीर्थ विकास, नागरी विमान वाहतूक
11) त्रिकंभाई बिजलबाई चांगा - उच्च आणि तांत्रिक शिक्षण
12) कमलेशभाई रमेशभाई पटेल - वित्त, पोलीस गृहनिर्माण, तुरुंग, सीमा सुरक्षा, गृह रक्षक दल, ग्राम रक्षक दल, नागरी संरक्षण, दारूबंदी आणि उत्पादन शुल्क
13) संजयसिंह विजयसिंह माहिदा - महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन, पंचायत आणि ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण विकास
14) पुनमचंद धनाभाई बारांडा - आदिवासी विकास, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार
15) स्वरूपजी दरदारजी ठाकोर - खादी, ग्रामोद्योग आणि ग्रामीण उद्योग
16) रिवाबा रविंद्रसिंह जडेजा - प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण