श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी वापरलेल्या 'त्या' शब्दामुळे संतापले ऋषी कपूर, ट्विट करून व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 10:30 IST2018-02-26T10:26:24+5:302018-02-26T10:30:45+5:30

श्रीदेवीच्या निधनाचा धक्का बसलेले अभिनेते ऋषी कपूर रविवारी संध्याकाळी प्रसार माध्यमांवर संतापले.

Rishi Kapoor Tweets in Anger After Media Refers To Sridevi As a 'Body' | श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी वापरलेल्या 'त्या' शब्दामुळे संतापले ऋषी कपूर, ट्विट करून व्यक्त केली नाराजी

श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी वापरलेल्या 'त्या' शब्दामुळे संतापले ऋषी कपूर, ट्विट करून व्यक्त केली नाराजी

मुंबई- अभिनेते ऋषी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल फोटो बदलून फक्त काळा फोटो ठेवला आहे. त्याबरोबर त्यांनी ‘श्रीदेवी. आरआयपी’ असं पोस्ट केलं आहे. श्रीदेवीच्या निधनाचा धक्का बसलेले अभिनेते ऋषी कपूर रविवारी संध्याकाळी प्रसार माध्यमांवर संतापले. श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी वृत्तवाहिनींवर सांगताना वापरल्या गेलेल्या शब्दावर ऋषी कपूर चिडले होते. सर्व वृत्तवाहिन्या मृतदेह आज रात्री मुंबईत आणला जाईल, अशापद्धतीची ओळ आपल्या रिपोर्टिंगमध्ये वापरत आहेत. त्यावर आक्षेप घेत ऋषी कपूर यांनी म्हंटलं की, श्रीदेवींचा अचानक मृतदेह झाला? . (निधनानंतर) अचानक तुमची ओळख पुसली जाते आणि त्यांची ओळख फक्त मृतदेह इतकीच राहते? असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं. 

ऋषी कपूर यांनी रविवारी सकाळी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये श्रीदेवींच्या मृत्युचा धक्का बसल्याचं म्हटलं. ‘एका दुख:द बातमीने आजची सकाळ झाली, धक्कादायक आहे हे. आमची सहानभूती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींबरोबर आहे’, असं ट्विट त्यांनी केलं. चांदनी सिनेमातील श्रीदेवीचा एक फोटो ट्विट करत ‘यानंतर कधीच चंद्रप्रकाशातील रात्री येणार नाहीत. ‘चांदनी’ कायमची गेली.’ असं म्हंटलं.
ऋषी कपूर व श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. चांदनी, गुरूदेव, नागीन, बंजारा, कौन सच कौन झुटा अशा सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. 



 




 

Web Title: Rishi Kapoor Tweets in Anger After Media Refers To Sridevi As a 'Body'