माजी उपमहापौरांवर दंगलीचा गुन्हा

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

अकोल्यात हाणामारी : अन्य १६ जणांचाही समावेश

Riots committed on former Deputy Mayor | माजी उपमहापौरांवर दंगलीचा गुन्हा

माजी उपमहापौरांवर दंगलीचा गुन्हा

ोल्यात हाणामारी : अन्य १६ जणांचाही समावेश
अकोला : खदान परिसरातील एका मशिदीजवळ रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध दंगलीसह प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी यांचाही समावेश आहे.
विवाह सोहळ्यासाठी रविवारी येथील मशिदीजवळ मंडप उभारण्यात आला होता. मंडपासमोरच खत्री आणि सिद्दिकी कुटुंबीय राहतात. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. दोन्ही गटांतील युवकांनी पाइप, तलवारी आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. मारहाणीत ७- ८ जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी माजी उपमहापौर रफीक सीद्दीकी यांच्यासह ९ जणांविरुद्ध, तसेच दुसर्‍या गटाच्या तक्रारीवरून मो. शाहरुख मो. फारुख याच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हे केले. लग्नसमारंभाचा आणि हाणामारीचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: Riots committed on former Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.