शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; रिंकू शर्माच्या हत्येला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:09 IST

Rinku Sharma Murder Case And Amit Shah : दिल्लीत सत्ताधारी पार्टी असलेल्या आम आदमी पार्टी (AAP) ने  गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी मंगोलपुरी परिसरात रिंकू शर्मा (Rinku Sharma) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रिंकू भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे. याच दरम्यान दिल्लीत सत्ताधारी पार्टी असलेल्या आम आदमी पार्टी (AAP) ने  गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपने रिंकू शर्माच्या हत्येसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचं म्टटलं आहे.

आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी अमित शहांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीत हत्या होणं ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आपने या प्रकरणात असून शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. तसेच "दिल्लीत हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत" असं आपने म्हटलं आहे. 

"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली, हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब"

"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचं अनेक घटनांतून समोर येत आहे. आम्ही हत्येचा तीव्र निषेध करतो" असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी रिंकू शर्माची हत्या करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं मत विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केलं. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं की, रिंकूचा भाऊ विहिंप युवा संघटनेचा सदस्य असून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्याचा कामात रिंकू सक्रियपणे भाग घेत होता.

सोशल मीडियावर न्याय मिळावा अशी मागणी

ट्विटरवर रिंकू शर्माला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.  #JusticeForRinkuSharma टॉप ट्रेंड करीत आहे. #HindusLivesMatter हॅशटॅग देखील खूप वापरला जात आहे. अनेक सेलिब्रेटींनीही याबाबत आपले मत व्यक्त करून न्यायाची मागणी केली आहे. रिंकू शर्माच्या हत्येबाबत न्यायाची मागणी करणार्‍यांमध्ये कंगना राणौत, प्रणिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजपाचे महासचिव एस. के. विष्णुवर्धन रेड्डी, यू ट्यूबर एल्विश यादव इत्यादींचा समावेश आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhiदिल्लीRinku Rajguruरिंकू राजगुरूMurderखूनAAPआप