जिल्हा ग्राहक मंचाच्या रजिस्ट्रारला खंडपीठाचे अधिकार पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती येथेच अपील करता येणार
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:09+5:302015-02-14T23:51:09+5:30
पुणे : पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती या चार ठिकाणी राज्य आयोगाचे खंडपीठ सुरू करण्याचा नुकताच शासनाने निर्णय घेतल्यानंतर राज्य माहिती आयोगाने जिल्हा ग्राहक मंचाच्या रजिस्ट्रारला हे कामकाज करण्याचे अधिकार दिले आहेत. शासनाच्या निर्णयानंतर तातडीने राज्य माहिती आयोगाने हे परिपत्रक जारी केल्याने कामकाज लवकर सुरू होण्याची शक्यता वाढली असून पक्षकारांना आपल्या खटल्यात अपील करण्यासाठी पुण्याबाहेर जाण्याचे वाचणार आहे.

जिल्हा ग्राहक मंचाच्या रजिस्ट्रारला खंडपीठाचे अधिकार पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती येथेच अपील करता येणार
प णे : पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती या चार ठिकाणी राज्य आयोगाचे खंडपीठ सुरू करण्याचा नुकताच शासनाने निर्णय घेतल्यानंतर राज्य माहिती आयोगाने जिल्हा ग्राहक मंचाच्या रजिस्ट्रारला हे कामकाज करण्याचे अधिकार दिले आहेत. शासनाच्या निर्णयानंतर तातडीने राज्य माहिती आयोगाने हे परिपत्रक जारी केल्याने कामकाज लवकर सुरू होण्याची शक्यता वाढली असून पक्षकारांना आपल्या खटल्यात अपील करण्यासाठी पुण्याबाहेर जाण्याचे वाचणार आहे. जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या निकालाविरोधात अपील करण्याची अथवा वीस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचा दावा दाखल करण्यासाठी मुंबई राज्य ग्राहक आयोगाकडे होणारी धावपळ कमी करण्यासाठी राज्यात चार ठिकाणी राज्य आयोगाची खंडपीठे सुरू करण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर या बेंचचे कामकाज कसे चालणार आहे याबाबत वकिल पक्षकारांमध्ये उत्सुकता होती मात्र यासंदर्भात राज्य ग्राहक आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्य ग्राहक आयोगाची खंडपीठ पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे सुरू होणार आहेत. ज्यांना या बेंचपुढे अपील दाखल करायची आहेत त्यांनी संबंधित जिल्हा मंच आणि राज्य आयोगाच्या रजिस्ट्रारकडे आपल्या ई-मेल आयडीसह माहिती द्यावयाची आहे. खंडपीठाचे कामकाज पाहण्याचे अधिकार संबंधित जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या रजिस्ट्रारला देण्यात आले आहेत. राज्य ग्राहक आयोग मुंबई यांच्या निर्देशानुसार हे रजिस्ट्रार आयोगाच्या खंडपीठाचेही काम पाहणार आहेत.राज्य आयोगापुढे प्रलंबित असलेले खटले या खंडपीठापुढे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. राज्य आयोगाच्या या खंडपीठापुढे मांडण्यात येणार्या खटल्यांची यादी राज्यातील सर्व ग्राहक मंचापुढे लावण्यात येणार आहे. तसेच संबंधित पक्षकार आणि वकिलांना यासंदर्भात नोटीस पाठविण्यात येणार आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक, अमरावती येथील जिल्हा मंचाचे रजिस्ट्रार हे खंडपीठाचे काम पाहण्याचे अधिकार असणारे आहेत. मुंबई राज्य आयोगाच्या रजिस्ट्रारच्या सहकायार्ने हे काम पाहतील.चौकट कोल्हापूर येथील खंडपीठापुढे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील खटले चालविण्यात येणार आहेत. पुण्यातील खंडपीठपुढे पुणे ग्राहक मंच, पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच आणि सोलापूर येथील केसेस मांडता येणार आहेत. नाशिक येथील खंडपीठापुढे नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथील खटले मांडता येणार आहेत. अमरावती येथील खंडपीठापुढे अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ येथील जिल्हा मंचाचे खटले चालविण्यात येणार आहेत.