शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

राज्यसभा निवडणुकीत मत न देण्याचा हक्क, निवडणूक आयोग, ‘नोटा’ तरतुदीचे सुप्रीम कोर्टात समर्थन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 1:12 AM

राज्यसभा निवडणुकीत आमदार हे मतदार असतात व लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये होणाºया अन्य निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही त्यांना कोणालाही मत न देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतही ‘नोटा’ची तरतूद करणे पूर्णपणे कायदेशीर आहे, असे प्रतिपादन निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केले.

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत आमदार हे मतदार असतात व लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये होणा-या अन्य निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही त्यांना कोणालाही मत न देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतही ‘नोटा’ची तरतूद करणे पूर्णपणे कायदेशीर आहे, असे प्रतिपादन निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केले.गुजरात विधानसभेतून झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतपत्रिकेत ‘नोटा’चा पर्याय दिला गेला. त्यास आव्हान देणारी याचिका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोत शैलेश परमार यांनी केली. त्या याचिकेच्या उत्तरात आयोगाने मतदानासाठी ‘नोटा’ची तरतूद करण्याचे समर्थन करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ७९ (डी) अन्वये मतदारास असलेल्या मतदान करण्याच्या हक्कामध्ये मतदान न करण्याचा अधिकारही अंतर्भूत आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१३मध्ये ‘पीयूसीएल’च्या प्रकरणात दिला. त्यानुसार मतपत्रिकेत निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत न देण्याचा (नन आॅफ द अबव्ह-नोटा) पर्याय देण्याचा आदेश न्यायालयाने दिला, याचा उल्लेख आयोगाने केला.राज्यसभा निवडणूक अप्रत्यक्ष असली तरी मतदार या नात्याने आमदारांवर पक्षादेश बंधनकारक नसतो. पक्षादेश मोडल्यास पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सन २००६मध्ये कुलदीप नय्यर प्रकरणात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमदार मर्जीनुसार मतदान करू शकतात. याचाच अर्थ त्यांना कोणत्याही उमेदवारास मत द्यायचे नसले तरी तो पर्याय ते निवडू शकतात. याचसाठी राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय दिला गेला आहे.यापूर्वीही होती ही तरतूदआयोगाने नमूद केले की, गुजरातमधील राज्यसभा निवडणूक ही ‘नोटा’ लागू केले जाण्याची पहिली वेळ नव्हती. ‘पीयूसीएल’ प्रकरणातील निकालांनंतर जानेवारी २०१४पासून आयोगाने ‘नोटा’ची तरतूद लागू केली आहे. त्यानंतरच्या तीन वर्षांत सर्व राज्यांमधील राज्यसभेच्या द्वैवाषिक निवडणुका व २५ पोटनिवडणुका अशाच पद्धतीने घेतल्या आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत