देशातील सर्वात श्रीमंत आमदार महाराष्ट्रातील; सर्वांत गरीब आमदार कोण? आकडा पाहून गरगरतील डोळे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:07 IST2025-06-03T16:06:51+5:302025-06-03T16:07:13+5:30
एक योगायोग असा आहे की, देशातील सर्वात श्रीमंत आमदार आणि सर्वात गरीब आमदार हे एकाच पक्षाचे आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत आमदार महाराष्ट्रातील; सर्वांत गरीब आमदार कोण? आकडा पाहून गरगरतील डोळे...
लोकसभा निवडणुका असोत किंवा विधानसभा त्या त्या राज्यांच्या मतदारांना आपापल्या राज्यातील नेत्यांची संपत्ती किती हे जाणून घ्यायची फारच उत्सुकता असते. आमदार, खासदारांची संपत्ती किती हे गुगलवर देखील मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते. निवडणूक आयोगही आता खुलेआमपणे या नेत्यांनी जाहीर केलेली संपत्ती उघड करत असतो. आता याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असले तरी देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार कोण, या प्रश्नाची नावे आली आहेत.
एक योगायोग असा आहे की, देशातील सर्वात श्रीमंत आमदार आणि सर्वात गरीब आमदार हे एकाच पक्षाचे आहेत. तो म्हणजे भाजप. चला आता पुढे जाऊया. आता या सर्वात श्रीमंत आमदाराच्या संपत्तीने एवढा काही फारसा फरक पडणार नाही परंतू सर्वात गरीब आमदाराच्याकडची संपत्तीची रक्कम पाहून तुमचे डोळे पांढरे होणार आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने काही काळापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांच्या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भाजपच्या आमदारांकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे दिसत आहे.
सर्वात श्रीमंत आमदार तर तुम्हाला माहितीच आहेत...
मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील भाजप आमदार पराग शाह हे भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. २०१९ च्या शपथपत्राानुसार शाह यांच्याकडे ५०० कोटींची संपत्ती होती. यानंतरच्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ५०० कोटींवरून थेट ३,३८३ कोटी रुपयांवर पोहोचली होती. ५ वर्षात आश्चर्यकारक अशी ५७५ टक्क्यांनी वाढ झाली होती.
सर्वात गरीब आमदार कोण?
पश्चिम बंगालचे भाजप आमदार निर्मल कुमार धारा हे देशातील सर्वात गरीब आमदार ठरले आहेत. त्यांच्याकडे फक्त १७०० रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.