आदित्यनाथांनी आमच्या आस्थेचा अभिमान पुनरुज्जीवित केला; अयोध्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे काैतुकोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 05:39 IST2023-04-11T05:38:39+5:302023-04-11T05:39:08+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या आस्थेचा अभिमान पुनरुज्जीवित केला

Revived Pride Of Our Faith Eknath Shinde Meets Yogi Adityanath In UP | आदित्यनाथांनी आमच्या आस्थेचा अभिमान पुनरुज्जीवित केला; अयोध्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे काैतुकोद्गार

आदित्यनाथांनी आमच्या आस्थेचा अभिमान पुनरुज्जीवित केला; अयोध्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे काैतुकोद्गार

लखनौ :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या आस्थेचा अभिमान पुनरुज्जीवित केला, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत सुरू असलेल्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले.

मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सहकाऱ्यांनी रविवारी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिष्टाचार भेट घेतली. आदित्यनाथ यांनी त्यांच्या सन्मानार्थ रात्रीभोजचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री शिंदे  उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांनी अयोध्येला भेट दिली. गेल्या जूनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. आदित्यनाथ यांच्या भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या गटाने अयोध्या भेटीचा अनुभव सांगत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली प्रभू रामाचे शहर विकासाची नवी उंची गाठत आहे. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.

 

Web Title: Revived Pride Of Our Faith Eknath Shinde Meets Yogi Adityanath In UP